• Download App
    ३१ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी स्वीकारुन परिवहन मंत्री राजीनामा देणार का?गोपीचंद पडळकरांचा सवाल । Will Transport Minister resign accepting responsibility for suicides of 31 employees? Gopichand Padalkar's question

    ३१ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी स्वीकारुन परिवहन मंत्री राजीनामा देणार का?गोपीचंद पडळकरांचा सवाल

    कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे वेतन मिळाले नसल्यामुळे उपासमारीला आणि कर्जबाजारीला त्रासलेल्या ३१ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. Will Transport Minister resign accepting responsibility for suicides of 31 employees? Gopichand Padalkar’s question


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे वेतन मिळाले नसल्यामुळे उपासमारीला आणि कर्जबाजारीला त्रासलेल्या ३१ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली.

    यावेळी गोपीचंद पडळकर यांनी महविकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे की , या ३१ कर्मचाऱ्यांच्या आत्म्याचा तळतळाट सुखानं जगू देणार नाही .पुढे पडळकर यांनी या आत्महत्यांची जबाबदारी स्वीकारुन परिवहन मंत्री राजीनामा देणार का? असा सवालही केला आहे.

    कर्मचाऱ्यांच्या संपाला गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा

    भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. राज्य सरकार जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि सातवा वेतन आयोग लागू करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा पडळकर यांनी यापुर्वीच दिला आहे. तसेच एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणीही एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.



    पुढे गोपीचंद पडळकर म्हणाले की , आतापर्यंत ३१ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. परंतु हे प्रस्थापितांचं सरकार झोपेचं सोंग घेत आहे. कोर्टाची दिशाभूल करत आहे.स्वतःची जबाबदारी न्यायालयावर ढकलून नामनिराळे राहायचे हाच राज्य सरकारचा डाव आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेतली असती तर ३१ कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले असते आणि महाराष्ट्रातील जनतेची गैरसोय झाली नसती असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

    अनिल परब राजीनामा देणार का?

    राज्य सरकारमध्ये जराही नैतिकता शिल्लक असेल तर ३१ जणांनी केलेल्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारुन परिवहन मंत्री अनिल परब राजीनामा देणार का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

    Will Transport Minister resign accepting responsibility for suicides of 31 employees? Gopichand Padalkar’s question

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस