वृत्तसंस्था
पुणे – पंजाब आणि बंगालमध्ये सीमा सुरक्षा दल बीएसएफच्या कार्यकक्षेत केंद्र सरकारने वाढ केली आहे. यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतली आहे.will be meeting Home Minister Amit Shah to know his thoughts about it: NCP Chief Sharad Pawar
मी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून बीएसएफच्या कार्यकक्षेबाबत माहिती घेणार आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना केले.
पंजाब, बंगाल आणि आसाममध्ये ड्रग्ज तसेच शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी बीएसएफची कार्यकक्षा वाढविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. आधी या राज्यांच्या सीमाअंतर्गत १५ किलोमीटर परिसरात बीएसएफ कायदेशीर कारवाई करू शकत होती. आता ही कार्यकक्षा वाढवून ५० किलोमीटर करण्यात आली आहे. यासाठी भारतीय फौजदारी कायद्यात बदल केला आहे. बाकीच्या कायद्यांमध्ये बदल केलेला नाही.
मात्र, पंजाब आणि बंगाल मधील सरकारांनी केंद्राच्या या निर्णयाविरोधात मतप्रदर्शन केले आहे. यावरून केंद्र – राज्य वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अमित शहा यांना भेटण्याचे वक्तव्य केले आहे. अमित शहांना भेटून मी बीएसएफची कार्यकक्षा समजून घेणार आहे, असे ते म्हणाले आहेत.
will be meeting Home Minister Amit Shah to know his thoughts about it: NCP Chief Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे, बारामती, कोल्हापूर, जयपूरसह ७० ठिकाणी छाप्यांमध्ये सापडलेली बेहिशेबी मालमत्ता १८४ कोटींची!!
- चंद्रकांत पाटलांची मोठी ऑफर ; म्हणाले – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांना पराभूत करा अन् सोन्याचा मुकुट मिळवा
- जी २३ नेत्यांना सोनिया सुनावत असताना #यह दिल मांगे राहुल #YehDilMangeRahul जोरदार ट्विटरवर ट्रेंड
- नवाब मलिक यांचा पुन्हा एनसीबीवर वार, एकापाठोपाठ ट्विट करत समीर वानखेडेंना घेरले, म्हणाले – फ्लेचर पटेल कोण हे NCBने सांगावं!