प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याचे आवाहन केल्यानंतर त्यावरुन त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच आता मनसेने मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी केल्यानंतर त्याला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तर दिले आहे. सीसीटीव्ही लावणे हा प्रत्येक धार्मिक स्थळांचा ऐच्छिक निर्णय असून त्यात राज्य सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. Why there are no CCTVs in mosques
इच्छेने निर्णय घ्यावा
राज्यातील मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यासंदर्भात कोणीही सूचना दिलेल्या नाहीत. मंदिरात जर कोणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्वच्छेने सीसीटीव्ही लावत असतील तर तो त्यांचा ऐच्छिक प्रश्न आहे. इतर धर्मीयांना त्यांच्या प्रार्थना स्थळांमध्ये सीसीटीव्ही बसवायचे असतील तर त्याला सरकारचा विरोध असणार नाही. आपल्या इच्छेनुसार त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
मनसेची मागणी
जवळपास सर्वच मंदिरांत सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. परंतु मशिदींमध्ये सीसीटीव्ही आहेत का? सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांत सीसीटीव्ही यंत्रणा का करू नये? यामुळे अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल, तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. महाराष्ट्र सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली होती.
Why there are no CCTVs in mosques
महत्त्वाच्या बातम्या
- गुणरत्न सदावर्तेंच्या मागे पोलिसी चौकशीचा ससेमिरा; मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा!!
- भोंग्यांची ढकला – ढकली!! : संजय राऊतांची केंद्रावर; वळसे पाटलांची सर्वपक्षीय बैठकीवर!!
- Raj Thackeray : आता मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मनसे नेते बाळा नांदगावकरांची मागणी!!
- लिंबू झाले महाग? या गोष्टींमधून मिळवा पुरेसे व्हिटॅमिन सी