• Download App
    समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपूनही बदली का नाही? वानखेडेंना त्याच पदावर ठेवण्यासाठी बड्या भाजप नेत्याचं लॉबिंग, नवाब मलिकांचा आरोप। Why Sameer Wankhedes transfer Not Given As His tenure ended Nawab Malik's allegation of lobbying by big BJP leader to keep Wankhede in the same post

    समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपूनही बदली का नाही? वानखेडेंना त्याच पदावर ठेवण्यासाठी बड्या भाजप नेत्याचं लॉबिंग, नवाब मलिकांचा आरोप

    राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. यावर्षी आणखी फर्जीवाडा समोर आणणार असं त्यांनी जाहीर केलं आहे. एवढंच नाही, तर समीर वानखेडे यांना त्याच पदावर कायम ठेवण्यासाठी दिल्लीतून एका बड्या भाजप नेत्याकडून लॉबिंग केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. Why Sameer Wankhedes transfer Not Given As His tenure ended Nawab Malik’s allegation of lobbying by big BJP leader to keep Wankhede in the same post


    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. यावर्षी आणखी फर्जीवाडा समोर आणणार असं त्यांनी जाहीर केलं आहे. एवढंच नाही, तर समीर वानखेडे यांना त्याच पदावर कायम ठेवण्यासाठी दिल्लीतून एका बड्या भाजप नेत्याकडून लॉबिंग केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

    पत्रकार परिषदेत नवाब मलिक म्हणाले की, मागील काही काळापासून समीर वानखेडे कार्यकाळ वाढवून मागत नसल्याच्या व ते दोन महिने सुटीवर जाणार असल्याच्या बातम्या पेरल्या जातायत.’ कार्यकाळ संपूनही त्यांची बदली अजूनही का करण्यात आली नाही? असा सवालही त्यांनी केला.

    मलिक म्हणाले की, मला आणि माझ्या कुटुंबाला घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण, आम्ही घाबरणाऱ्यांतले नाही. मागच्या वर्षी फर्जीवाडा समोर आणला तसा या वर्षीही समोर आणणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

    मलिक म्हणाले की, मागच्या काही काळापासून हजारो कोटी रुपयांची वसुली सुरू आहे. त्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन झाली होती, त्याचं पुढे काय झाले हे अजून समोर आलं नाही. आमच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला. मी कोर्टाच्या आदेशानुसार सर्व पुरावे कोर्टात सादर केले. त्यावेळी न्यायालयाला मी हेसुद्धा विचारलं होतं की मला एनसीबी जर काही चुकीचं काही करत असेल तर त्याविरोधात बोलण्याचा अधिकार आहे का तर त्याला हो असं उत्तर मिळालं होतं.’

    Why Sameer Wankhedes transfer Not Given As His tenure ended Nawab Malik’s allegation of lobbying by big BJP leader to keep Wankhede in the same post

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस