प्रतिनिधी
मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारी माघारी वरून सुरु झालेल्या राजकारणाने आरोप – प्रत्यारोपांचे वळण घेतले आहे. संभाजीराजांचे पिताश्री छत्रपती शाहू महाराज यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान साधले. त्याला संजय राऊत यांनी दुजोरा दिला. Whose loss in Western Maharashtra due to the rise of Sambhaji Raje’s leadership
मात्र आता या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. त्याच वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता शरसंधान साधले आहे. छत्रपती संभाजीराजे यांचे नेतृत्व गेल्या सहा वर्षांपासून पुढे येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात असे नेतृत्व पुढे येत असेल, ते मराठा समाजात आणि बहुजन समाजात लोकप्रिय होत असेल तर या नेतृत्वाचा धोका नेमका कोणाला आहे??, हे महाराष्ट्राचे राजकारण जरा थोडेफार कळते त्याला समजते. त्यामुळे संभाजीराजे यांचे नेतृत्व पुढे येऊ नये यासाठी कोणी प्रयत्न केले हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या दिशेने बाण मारला आहे.
त्याचबरोबर त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काही किडक्या डोक्याच्या लोकांनी छत्रपती शाहू महाराज यांना चुकीची माहिती देऊन त्यांच्या डोक्यात काही विशिष्ट गोष्टी भरवल्या आहेत. त्यामुळेच त्यांनी काही विधान केले असेल. परंतु शाहू महाराज हे छत्रपती आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर कोणते विधान करणे मला योग्य वाटत नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
– फडणवीस यांना भेटण्यापूर्वी संभाजीराजांची अपक्ष उमेदवारी जाहीर
छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारी च्या मुद्द्यावर फडणवीस यांनी खुलासा केला. संभाजी राजे यांनी मला भेटण्यापूर्वी यांचे अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. कोणत्याही पक्षाची उमेदवारी स्वीकारणार नाही हे त्यांनीच स्पष्ट केले होते. ते फक्त आपल्याला आभार मानण्यासाठी भेटले, असे फडणवीस म्हणाले. भाजपने संभाजीराजांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा मुद्दा पक्षाचे हायकमांड घेत असते मी पक्षाचे हायकमांड अशी चर्चा करीत एवढेच संभाजीराजे यांना सांगितले होते असा खुलासाही फडणवीस यांनी केला.
Whose loss in Western Maharashtra due to the rise of Sambhaji Raje’s leadership
महत्वाच्या बातम्या