• Download App
    ... मग बबनराव लोणीकरांच्या नावाने मराठी माध्यमांनी वाजवलेली ऑडिओ क्लिप नेमकी कुणाची??|Whose audio clip was played by Marathi media in the name of Babanrao Lonikar?

    … मग बबनराव लोणीकरांच्या नावाने मराठी माध्यमांनी वाजवलेली ऑडिओ क्लिप नेमकी कुणाची??

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची ऑडिओ क्लिप दुपारपासून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिप मधून बबनराव लोणीकर हे कथित स्वरूपात वीज अभियंत्यांना धमकी देत असल्याचे ऐकू येत होते. मात्र आता स्वतः बबनराव लोणीकर यांनी याबाबत खुलासा केला आहे.Whose audio clip was played by Marathi media in the name of Babanrao Lonikar?

    मूळात माझे वीज मीटर कोणी काढून नेलेले नाही. त्यामुळे मी कोणत्याही वीज अधिकाऱ्याला फोन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली क्लिप माझी नाही, तर माझ्याविरुद्ध वीज वितरण कंपनीच्या आडून कोणीतरी रचलेले षडयंत्र आणि कुभांड आहे, असा आरोप बबनराव लोणीकर यांनी केला आहे.



    संबंधित ऑडिओ क्लिप मध्ये बबनराव लोणीकर हे कथित स्वरूपात वीज कंपनीच्या अभियंत्यांना अपशब्द वापरत इन्कम टॅक्स छापे काढण्याची धमकी देत असल्याचे ऐकू येत आहे. परंतु आता स्वतः बबनराव लोणीकर यांनी संबंधित ऑडिओ क्लिप आपले असल्याचे नाकारल्यानंतर ही नेमके ऑडिओ क्लिप कोणाची आहे. त्यातला आवाज नेमका कोणाचा आहे? हा प्रश्न तयार झाला आहे. त्याचबरोबर मराठी माध्यमांनी नेमकी कोणाची ऑडिओ क्लिप बबनराव लोणीकर यांच्या नावाने चालवली आहे? प्रश्न तयार झाला आहे. यासंदर्भात वीज मंडळाने देखील अद्याप कोणता अधिकृत खुलासा केलेला नाही.

    Whose audio clip was played by Marathi media in the name of Babanrao Lonikar?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ