ज्या वेळेला असे सरकार येते, ते मजबूत स्थितीत वाटत असते, तेव्हा अतंर्गत विरोधातूनच ते सरकार पडते. अस देखील फडणवीस म्हणालेWho will overthrow the government, when? What exactly did Devendra Fadnavis say about this?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला रविवारी दोन वर्षे पूर्ण झाली.अशावेळी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये जोरदार टीकाटीप्पणी सुरु झालीय.
यावेळी भाजप नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार मार्च महिन्यात पडेल असं वक्तव्य केलं.
त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच फडणवीस यांना एका मुलाखतीत महाविकास आघाडी सरकार कधी पडणार , सरकार कोण पडणार यावर प्रश्न विचारले होते.
सरकार पडण्याविषयी फडणवीसांच उत्तर
देवेंद्र फडणवीस म्हणाले की , ”या सरकारला पडण्याचीच खूप धास्ती आहे. त्यांना ही सत्ता म्हणजे 20-20 ची मॅच वाटते. कधी संपेल सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी मागील दोन वर्षात जेवढं लुटता येईल, तेवढं लुटण्याचं काम केलं”.
अमरावतीकरांना भोगावे लागले, ते अंगावर शहारे आणणारे!!; देवेंद्र फडणवीसांनी घेतली पीडितांची भेट
हे महाविकास आघाडीचं सरकार अंतर्विरोधातूनच पडणार. आतापर्यंत राजकीय इतिहासच असा सांगतो. ज्या वेळेला असे सरकार येते, ते मजबूत स्थितीत वाटत असते, तेव्हा अतंर्गत विरोधातूनच ते सरकार पडते. अस देखील फडणवीस म्हणाले
भाजप नेते नारायण राणे यांनी येत्या मार्च महिन्यात सरकार पडेल, असं वक्तव्य केलंय, त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले, नारायण राणेंनी हे विधान कोणत्या संदर्भाने केलंय, हे मी सांगू शकत नाही.
Who will overthrow the government, when? What exactly did Devendra Fadnavis say about this?
महत्त्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्या डान्सवर विखे पाटलांची प्रतिक्रिया , म्हणाले ….
- पाच दिवसांचे असेल विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, २२ ते २८ डिसेंबरदरम्यान मुंबईत होणार
- राज्यातील जिल्हा परिषदांतील सदस्यांची संख्या वाढणार, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय
- IB Alert : संसदेला घेराव आणि खलिस्तानी झेंडा फडकवण्याचा कट, पोलीस-गुप्तचर यंत्रणा सतर्क