Friday, 2 May 2025
  • Download App
    "कोण म्हणतं देत नाय, आन घेतल्याशिवाय राहत नाय! कामगार एकजुटीचा विजय असो" - चित्रा वाघWho says don't give, don't live without taking! May the victory of workers' unity be "- Chitra Wagh

    “कोण म्हणतं देत नाय, आन घेतल्याशिवाय राहत नाय! कामगार एकजुटीचा विजय असो” – चित्रा वाघ

    परिवहण मंत्री अनिल परब यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांच्या समन्वयकांसोबत बैठक घेतली तरीही हा प्रश्न सुटला नाही.Who says don’t give, don’t live without taking! May the victory of workers’ unity be “- Chitra Wagh


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मागील आठ दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हे कर्मचारी आंदोलन करत आहेत. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे महामंडळ कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. परिवहण मंत्री अनिल परब यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांच्या समन्वयकांसोबत बैठक घेतली तरीही हा प्रश्न सुटला नाही.

    दरम्यान भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी चित्रा वाघ कर्मचाऱ्यांना म्हणाल्या की , राज्य सरकार तुमच्यावर वेगवेगळा दबाव निर्माण करत आहे. आजीबात घाबरू नका बंधू आणि भगिणींनो, हे कसे काय करतात आपण बघू. कोण म्हणतं देत नाय, आन आपण घेतल्याशिवाय राहत नाय! कामगार एकजुटीचा विजय असो, अशा घोषणाही चित्रा वाघ यांनी दिल्या.



    चित्रा वाघ यांनी ट्विट करत आघाडी सरकारवर टीका केली आहे. चित्रा वाघ म्हणल्या, तीन भिन्न विचारी पक्षांच्या विलीनीकरणातून महाविकास आघाडी सरकार सरकार स्थापन होऊ शकते. तर एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण का होऊ शकत नाही? सत्तेचा ‘मलिदा’ओरबाडून खाणारं तिघाडी सरकार. कर्मचाऱ्यांचे प्रश्न कधी सोडविणार? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

    तसेच या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी जाहीर पाठिंबा दर्शिवला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही आंदोलनात सहभाग नोंदविला आहे.परंतु या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर होत चालला आहे.

    Who says don’t give, don’t live without taking! May the victory of workers’ unity be “- Chitra Wagh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??

    Icon News Hub