प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते, सामानचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत आणि इतर अनेक लहान नेत्यांची आर्थिक स्थिती अनेक पटींनी वाढल्याचे, आत्तापर्यंत केलेल्या तपासात समोर आल्याचे सक्तवसूली संचालनालय अर्थात ईडीने सोमवारी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात म्हटले आहे. ईडीने सादर केलेल्या कागदपत्रातील हे “लहान नेते” नक्की कोण आहेत?? कोणाच्या आशीर्वादामुळे त्यांची आर्थिक स्थिती कित्येक पटीने वाढली??, याचा तपास सुरू आहे. Who is Sanjay Raut get rich quick immediate leader Extreme secrecy of ED
मंगळवारी ईडीने 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यासंबंधित दोन ठिकाणी सर्च ऑपरेशन करून काहींना समन्स बजावले आहे. हे समन्स कुणाला बजावले याबाबत मात्र ईडीने गुप्तता पाळली आहे.
ईडीच्या तपासात काय?
गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने सोमवारी संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयात हजर केले होते. यावेळी ईडीने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात संजय राऊत यांच्या प्रवीण राऊत यांच्यासोबत झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांच्याकडून अतिरिक्त रोख रक्कम मिळाली, गुन्ह्यातील रक्कम रोख रकमेच्या स्वरुपात संजय राऊत यांनी किहीम, अलिबाग येथे जमीन खरेदीसाठी मालमत्ता संपादन करण्यासाठी वापरली होती, तसेच संजय राऊत आणि इतर अनेक लहान नेत्यांची आर्थिक स्थिती अनेक पटींनी वाढल्याचे, आत्तापर्यंत केलेल्या तपासात समोर आले असल्याचे, ईडीने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात म्हटले आहे.
ईडीचे सर्च ऑपरेशन सुरू
मात्र हे नेते नेमके कोण आहेत??, त्यांची आर्थिक स्थिती अनेक पटीने कशी वाढली?? ते झटपट श्रीमंत कसे झाले??, याबाबत ईडीने गुप्तता पाळली आहे. मंगळवारी ईडीने काही ठिकाणी सर्च ऑपरेशन (शोध मोहीम) सुरू केले, तसेच काहींना समन्सदेखील देण्यात आले असल्याचे समजते. ईडीच्या या कारवाईमुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
Who is Sanjay Raut get rich quick immediate leader Extreme secrecy of ED
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : EDने जप्त केलेल्या वस्तूंचे पुढे काय होते? कोट्यवधींचे दागिने, अब्जावधींची संपत्ती कुठे जाते? वाचा सविस्तर…
- मंकीपॉक्समुळे देशात पहिला मृत्यू : UAE मधून केरळला परतला होता 22 वर्षीय तरुण, परदेशातही आढळला होता संसर्ग
- एकाच दिवशी 72.42 लाखांपेक्षा जास्त ITR दाखल करण्याचा नवा विक्रम ; 31 जुलैपर्यंत 5.83 कोटी विवरणपत्रे दाखल
- GST Collection : जुलैमध्ये जीएसटी संकलन १.४९ लाख कोटी रुपये, तब्बल २८% वाढ; करचोरीही घटली