Monday, 12 May 2025
  • Download App
    तुम्ही कुठे जात आहात,घरीच राहा ना, भाई ! जेव्हा सायकलवरून फिरणाऱ्या कलेक्टरला महिला कॉन्स्टेबल अडवते... Where are you going, stay at home, brother! When a female constable stops a collector on a bicycle ...

    तुम्ही कुठे जात आहात,घरीच राहा ना, भाई ! जेव्हा सायकलवरून फिरणाऱ्या कलेक्टरला महिला कॉन्स्टेबल अडवते…

    • वस्त्रनगरी भीलवाडामध्ये लॉकडाऊन आहे. पाहणी करण्यासाठी स्व:त जिल्हाधिकारी सायकलवरून फिरत होते. मात्र, गंमत अशी झाली की, सायकलवरून निघालेल्या जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यात एका महिला कॉन्स्टेबलने अडविले आणि विचारले कुठे निघालाय तुम्ही? राजस्थानच्या भीलवाडातील या घटनेची सध्या जोरदार चर्चा आहे.

    • मात्र, वस्तुस्थितीची माहिती झाल्यानंतर ती कॉन्स्टेबल महिला थोडीशी घाबरली, जिल्हाधिकाऱ्यांनी उलट कॉन्स्टेबलच्या कामाचं कौतुक करत ‘वेरी गुड’ असे म्हणत तुम्ही नेहमी अशा पद्धतीनं सावध असायला हवं, असे म्हटले.

    विशेष प्रतिनिधी

    भीलवाडा :राजस्थान मधील एक जबाबदार जिल्हाधिकारी तो पण महाराष्ट्राचा आणि एक कर्तव्यदक्ष महिला पोलिस यांचा जेव्हा आमना सामना होतो .कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानच्या भीलवाडामधील लॉकडाऊनची परिस्थितीची पाहणी करण्यासाठी स्व:त जिल्हाधिकारी सायकलवरून फिरत होते. मात्र, रस्त्यात एका महिला कॉन्स्टेबलने जिल्हाधिकाऱ्यांना अडविले आणि विचारले कुठे निघालाय तुम्ही? महिला पोलिसाच्या तत्परतेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनाही थांबावेच लागले. ज्यावेळी हे जिल्हाधिकारी आहे हे समजले त्यावेळी त्या घाबरल्या. परंतु जिल्हाधिकाऱ्यानी या महिला पोलिसाचे कौतुक केले.Where are you going, stay at home, brother! When a female constable stops a collector on a bicycle …

    गुलमंडी परिसरातुन जिल्हाधिकारी शिवप्रसाद एम. नकाते सायकलवरून फेरफटका मारत होते. त्यांनी टी शर्ट घातल्याने कोणीही त्यांना ओळखले नाही.

    दरम्यान याच परिसरात महिला पोलीस कर्मचारी निर्मला स्वामी आपले कर्तव्य बजावत होत्या. स्वामींना सायकलवरून एक व्यक्ती फेरफटका मार्ट असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी त्या व्यक्तीला अडवले. नकाते यांना विचारले, तुम्ही कुठे जात आहात, घरीच राहा ना, भाई. हा सर्व प्रकार सुरु असतानाच तेथे एक बंदूकधारी कर्मचारी पोहोचला अहो मॅडम, कुणाला थांबवत आहात… हे जिल्हाधिकारी आहेत, असे तो म्हणाल्याने काही वेळ महिला कॉन्स्टेबल घाबरून गेल्या. परंतु, जिल्हाधिकारी नकाते यांनी हा प्रसंग अगदी सहजतेने घेत, या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक केले.

    मंगळवारी जिल्हाधिकारी शिवप्रसाद एम. नकाते यांनी शहरातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी सकाळीच सायकलवरून प्रस्थान केले. जिल्हाधिकारी शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, परंतु ते सायकलवरून फिरत असल्याची त्यांना कल्पना नव्हती. या कालावधीत गुलमंडी परिसरातील ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी निर्मला स्वामींनी टी-शर्ट परिधान केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना ओळखलंच नाही आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता अडवून चौकशी केली. महिला पोलिसाच्या तत्परतेमुळं जिल्हाधिकाऱ्यांनाही थांबावंच लागलं.

    महिला कॉन्स्टेबलला झाला होता कोरोना

    या महिला कॉन्स्टेबलचे कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना आणि त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्या कोरोना नियम कटाक्षाने पाळण्याचा आग्रह करतात. कोरोनामुळे काय होतं ते मी आणि माझ्या कुटुंबानं पाहिलं आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सर्वांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

    Where are you going, stay at home, brother! When a female constable stops a collector on a bicycle …

    Related posts

    Pakistan High Commission : पंजाबमध्ये दोन पाकिस्तानी हेरांना अटक; दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात लष्कराची माहिती पाठवत होते, ऑनलाइन पेमेंट घेत होते

    Hamas support : पुण्यात हमास समर्थनाचे पोस्ट वाटणाऱ्या तरुणांना जमावाची मारहाण; परिसरात तणावाचे वातावरण; VIDEO व्हायरल

    Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचे आदेश- तिकडून गोळ्या चालल्यास, इकडून गोळे चालतील