• Download App
    महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलची दरवाढ कधी कमी होणार?; पवार म्हणाले, "केंद्राने महाराष्ट्राचे जीएसटी पैसे परत द्यावेत...!!" । When will petrol-diesel price hike come down in Maharashtra ?; Pawar said, "Center should refund GST of Maharashtra ... !!"

    महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलची दरवाढ कधी कमी होणार?; पवार म्हणाले, “केंद्राने महाराष्ट्राचे जीएसटी पैसे परत द्यावेत…!!”

    विशेष प्रतिनिधी

    बारामती : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केल्यानंतर अनेक राज्यांनी त्यावरचा व्हॅट कमी करून पेट्रोल-डिझेल ग्राहकांना दिलासा दिला आहे. परंतु, महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी सरकारने अद्याप तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही. When will petrol-diesel price hike come down in Maharashtra ?; Pawar said, “Center should refund GST of Maharashtra … !!”

    या विषयी बारामतीत आपल्या निवासस्थानी दिवाळी साजरी करायला आलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, की याबाबत राज्य सरकारशी बोलता येईल. परंतु केंद्र सरकारने कृपा करून राज्य सरकारचा जीएसटीचा वाटा लवकरात लवकर परत द्यावा. म्हणजे राज्यातल्या जनतेच्या हिताचा निर्णय घेता येऊ शकेल.



    शरद पवार यांनी एक प्रकारे महाराष्ट्रात पेट्रोल – डिझेल दरवाढ कमी करण्याच्या निर्णयाचा संबंध जीएसटी कलेक्शनशी जोडला आहे. केंद्राने जीएसटीचे राज्याचे देणे परत केले की मग महाराष्ट्रातल्या जनतेला पेट्रोल डिझेल दरवाढीतून काहीसा दिलासा देता येऊ शकेल, असेच त्यांनी सूचित केले आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानात दोन-तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील कोरोनाची चाचणी केली आहे. काळजी घेण्याच्या दृष्टीने ते बारामतीत दिवाळी साजरी करण्यासाठी आलेले नाहीत, असा खुलासा शरद पवार यांनी केला आहे.

    When will petrol-diesel price hike come down in Maharashtra ?; Pawar said, “Center should refund GST of Maharashtra … !!”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा