• Download App
    गुलाबरावांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी होणार? ; चित्रा वाघ यांनी उपस्थित केला सवालWhen will Gulabrao be removed from the ministry? ; Question posed by Chitra wagh

    गुलाबरावांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी होणार? ; चित्रा वाघ यांनी उपस्थित केला सवाल

    मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांसोबत केली. रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसले तर राजीनामा देईन, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.When will Gulabrao be removed from the ministry? ; Question posed by Chitra wagh


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : जळगाव जिल्ह्यात सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत आहे.यावेळी एकनाथ खडसेंवर टीका करताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांसोबत केली. रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसले तर राजीनामा देईन, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.
    त्यावरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थोबाड फोडण्याचा इशारा पाटलांना दिला आहे.



    गुलाबरावाची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी होणार?

    ”शिवसेनेच्या नेत्यांना नेमक काय झाल आहे? कारण संजय राऊतांनंतर आत्ता गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केलं. गुलाबराव पाटील आणि रांझ्याचा पाटील या दोघांची वृत्ती सारखी आहे. महाराजांनी रांझ्याच्या पाटलाची पाटीलकी काढून घेतली होती.त्यामुळे आता गुलाबरावाची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी होणार?” असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

    पोलिस यंत्रणांना महिलांचा विनयभंग दिसत नाही

    पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की ”शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरत आहेत. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसत आहेत. पण यामध्ये पोलिस यंत्रणांना महिलांचा विनयभंग दिसत नाही का? मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तत्काळ गुन्हा दाखल करा. नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही”, असा टोला चित्रा वाघ यांनी गुलाबराव पाटलांना दिला आहे.

    When will Gulabrao be removed from the ministry? ; Question posed by Chitra wagh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!