• Download App
    जेव्हा घडते दर्शन प्रामाणिकतेचे!; रिक्षाचालकाचा नाशिकमध्ये सन्मान । When the vision of honesty happens !; Rickshaw driver honored in Nashik

    जेव्हा घडते दर्शन प्रामाणिकतेचे!; रिक्षाचालकाचा नाशिकमध्ये सन्मान

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : माणुसकीच्या दर्शनाने समाजात अजून चांगुलपणा आहे हे काही प्रसंगात लक्षात येते. तसेच अनपेक्षितपणे प्रामाणिकपणाचे दर्शन घडले की माणूस सुखावतो. इंदिरानगरमधील शरद तिवारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक शालीमारहुन इंदिरानगरला शेअर रिक्षाने येत होते. ते घरी पोहोचल्यावर आपल्या खिशात पैशाचे पाकीट नाही हे त्यांच्या लक्षात आले. या पाकिटात काही रोख रक्कम व आधारकार्ड, पॅन कार्ड,एटीएम कार्ड इत्यादी महत्त्वाचे कार्ड होते. When the vision of honesty happens !; Rickshaw driver honored in Nashik

    रोख रक्कम गमावण्याचा दुःख होतेच. परंतु सर्व कार्ड्स पुन्हा नव्याने काढण्याचा मोठाच विषय होणार होता. बहुदा आपले पाकीट रिक्षात पडले असावे असा एक अंदाज त्यांना होता. परंतु रिक्षाचा नंबर अथवा रिक्षाचालकांची काहीच ओळख नव्हती.



    दरम्यान घाईगर्दीत उतरतांना तिवारी यांचे पैशाचे पाकीट रिक्षात पडले. हे रिक्षातील अन्य प्रवाशाच्या लक्षात आले. त्याने रिक्षाचालकांकडे हे पाकीट सुपूर्त केले. रोख रकमेचा कोणताही लोभ मनात न आणता रिक्षाचालक प्रेमकुमार चव्हाण यांनी कार्डावरील मोबाईल नंबरवरून तिवारी यांना संपर्क केला आणि पाकीट मिळाल्याचे सांगितले. त्याप्रमाणे ते पाकीट देण्यासाठी रिक्षा घेऊन पोहोचले.

    तिवारी यांना हा अत्यंत सुखद धक्का होता. त्यांचे डोळे भरून आले. वस्तू परत मिळणे व रिक्षाचालकांचा प्रामाणिकपणा यामुळे ते भारावून गेले. संघाचे स्वयंसेवक असलेल्या तिवारींनी मोदकेश्वर प्रभात या इंदिरानगर संघशाखेवर हा सुखद अनुभव सांगितल्यावर सर्वांनाच खूप आनंद वाटला.

    अशा प्रामाणिकपणाचे दर्शन घडल्यावर त्यास प्रोत्साहन देणे संघशाखेचे कामच असल्यामुळे प्रेमकुमार चव्हाण यांना शाखेवर बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. चव्हाण यांना सुद्धा या सन्मानाने आनंद वाटला. स्वार्थगतीच्या जमान्यात असे अनुभवांचे दर्शन घडले की अजूनही समाजजीवनातील असे अनुभव खूप आशादायक आहेत असे लक्षात येते.

    When the vision of honesty happens !; Rickshaw driver honored in Nashik

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ