• Download App
    शिवसेना-भाजप युती झाली तेव्हा उध्दव ठाकरे शाळेत शिकत होते, रावसाहेब दानवे यांनी उडवली खिल्ली|When Shiv Sena-BJP alliance was formed, Uddhav Thackeray was studying in school, mocked by Raosaheb Danve

    शिवसेना-भाजप युती झाली तेव्हा उध्दव ठाकरे शाळेत शिकत होते, रावसाहेब दानवे यांनी उडवली खिल्ली

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती झाली तेव्हा उद्धव ठाकरे शाळेत शिकत होते. राजकारणाचा साधा गंधही तेव्हा त्यांना नव्हता, अशा शब्दांत रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.When Shiv Sena-BJP alliance was formed, Uddhav Thackeray was studying in school, mocked by Raosaheb Danve

    भाजपसोबत केलेल्या युतीत शिवसेनेची 25 वर्षे सडली, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यावर आता भाजपच्या नेत्यांकडून पलटवार सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना-भाजप युतीवर उद्धव ठाकरे कोणत्या अधिकाराने बोलत आहेत?



    असा सवाल करत दानवे म्हणाले, ‘शिवसेना आणि भाजपची युती काही उद्धव ठाकरे यांच्यामुळे झालेली नव्हती. तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन हे या युतीचे शिल्पकार होते. काँग्रेसविरुद्ध लढण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. यात उद्धव ठाकरे यांचे कोणतेही योगदान नाही. त्यामुळेच त्यांनी याबाबत उगाच काहीही भाष्य करू नये .

    भाजपमुळेच मुंबई बाहेर शिवसेना वाढल्याचा दावा करताना दानवे म्हणाले की, मुंबई सोडली तर महाराष्ट्रात शिवसेना कुणालाही माहिती नव्हती. शिवसेनेचे अस्तित्व केवळ मुंबईपुरतेच मर्यादित होते. मात्र भाजपचा हात धरुन, भाजपसोबत युती करुन शिवसेना राज्यभरात पसरली. हे केवळ आणि केवळ भाजपच्या साथीमुळे शक्य झाले.

    महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढल्यास काय स्थिती होते हे उद्धव ठाकरे यांना चांगले ठाऊक आहे. शिवसेनेने गुजरात, गोवा आणि उत्तर प्रदेश या राज्यांत निवडणुका लढल्या आहेत. केवळ तेथील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शिवसेना लढते. तिथे ते कधीच निवडणूक जिंकू शकलेले नाहीत.

    बाळासाहेबांनी जो मार्ग दाखवला होता त्याच्या विरुद्ध दिशेने शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. शिवसेनेने आज हिंदुत्व सोडले असून सत्तेसाठी ते हिंदूविरोधी पक्षांसोबत गेले आहेत. त्यामुळे भाजपच्या हिंदुत्वाबाबत कुणी प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. हिंदुत्वासाठी भाजपने काय केले आणि इतरांनी सत्तेसाठी हिंदुत्वाकडे कशी पाठ फिरवली, हे जनतेला चांगलेच माहिती आहे, असा आरोपही दानवे यांनी केला.

    When Shiv Sena-BJP alliance was formed, Uddhav Thackeray was studying in school, mocked by Raosaheb Danve

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!