प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेत्यांना कोणत्या घोटाळ्यात कसे अडकवायचे?, अशा स्वरूपाचे कटकारस्थान असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. यामध्ये फडणवीसांनी जवळजवळ 125 तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग – ऑडिओ रेकॉर्डिंग विधानसभा अध्यक्षांना सादर केले आहे. या एकूणच कटकारस्थाना संदर्भात सीबीआय चौकशी करावी. अन्यथा मला कोर्टात जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.What’s in the “pen drive bomb” of Fadnavis
सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे ठाकरे – पवार सरकारमधील प्रमुख मंत्र्यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र भाजपातील प्रमुख नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवाचये आणि त्यांना अटक करायचे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुंगटीवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, चंद्रकांत बावनकुळे यांना टार्गेट करायचे, अशा प्रकारचे टूलकीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी विधानसभेत उघड केले.
यामध्ये सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी यासाठी खोटे गुन्हे दाखल करणे, खोटे पंचनामे तयार करणे यासाठीच प्लनिंग वकील चव्हाण करत आहे, तसे व्हिडिओ पुरावे म्हणून त्या पेनड्राइव्हमध्ये टाकून तो विधानसभा अध्यक्षांनी दिला.
वकील प्रवीण चव्हाण यांनी काय म्हटले?
- वकिलांचा संवाद : आम्हाला पैसा निलेश पुरवायचा, गुंडागर्दी करणे, दहशत पसरविणे असे सांगायचे आहे.
- ड्रग्जचा व्यवसाय करतो, हे तो सांगेल का? असे सांगितले तरच मोक्का लागेल. सट्ट्याच्या पैशातून मोक्का लागत नाही. पण सट्ट्याच्या पैशातून ड्रग्ज म्हटले की, मोक्का लागेल. 1 ग्रॅमला लाख रूपये मिळतात, असे सांगायचे.
- तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का?
- ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. केवळ संशय क्रिएट करणे पुरेसे. शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण? सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी. रवि शिंदेने त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले. संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचे.
- सारे जबाब मी लिहून दिले होते, त्यांनी हरवून टाकले. सगळा गोंधळात गोंधळ करून टाकला. पवार साहेबांनी डीजींना सांगितले. किती मिटिंगा झाल्या. सीपीला रात्रभर बसविले. पवार साहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला होतो. मी मागच्या दारातून गेलो. त्यांनी फोन लावले. मी गाडीत बसलो, तर लगेच डीजी चा फोन आला. सीएम, अजितदादा/वळसे पाटील/एसीएस, डीजी होते. सीपीला रात्रभर बसवून ठेवले. रजत नागपूरला निघून गेला. मग सीपीचे फोनवर फोन आले.
- सर्व निगेटिव्ह होते. मी कॉपी दिली. शेवटी पवार साहेबांना सांगून अधिकारी बदलविला. अनिल देशमुख असते, तर फायदा झाला असता. प्रवीण चव्हाण आला तर त्याला अँटीचेंबरला बसवा, असे पवार साहेबांचे ऑर्डर होते. अनिल देशमुखांचे माझ्याशिवाय पान हलायचे नाही.
- अजित पवार सपोर्ट करीत नाही. पर बडे साब सब देख रहे है. कोणी चांगले अधिकारी आहेत का? चार/पाच अधिकार्यांची चांगली नावे असेल तर द्या, असे त्यांनी मला सांगितले.
- अॅड. प्रवीण चव्हाण हे कट कसा रचत आहेत, याचे एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी झालेले संभाषण आहे.
- रेडमध्ये सहभागी होणार्या पोलिस कर्मचार्यांची संपूर्ण व्यवस्था ते सांगत आहेत. कुठल्या मार्गाने जायचे आणि काय काय करायचे, याची सूक्ष्म व्यवस्था सरकारी वकिलांनी ब्रीफ केली आहे. अगदी सरकारचे रेस्टहाऊस सुद्धा बुक करून दिले आहे. वेज/नॉन-व्हेज जेवनापर्यंत सूक्ष्म नियोजन जेवणाची/राहण्याची आणि रूम कुणाच्या नावाने बुक करायच्या, कॅशमध्ये कसे पैसे द्यायचे, याची संपूर्ण कथा ते सांगत आहेत. यासाठी कोणती मदत लागली तर खडसे साहेबांची मदत घ्या, असेही निर्देश दिले आहेत. खडसे साहेब सर्व पैसे देतील, असेही त्यांनी सांगितले.
- त्याला ब्लड लावून ठेवले असते आणि चाकू जप्त केला असता. एक चाकू विकत घ्यायचा आणि जोवर चर्चा सुरू आहे, तोवर तेथे फेकून द्यायचा. जप्त करायला काय लागते? किती जणांनी माझे नाव या केससाठी रेकमंड केले? दिलीप बोरले, वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अर्जून खोतकर, अनिल देशमुख, रमेश जाधव, गुलाबराव, हसन मुश्रिफ, श्रीनिवास पाटील यांची नावे घेत, त्यांची पत्र मोबाईलवर दाखवितात.या सर्वांनी पवारांना पत्र दिले.
- गिरीश महाजन अटकत नाही. सीपीला काढल्याशिवाय पर्याय नाही. डीजीला भेटणार आहे. नाव घेत नव्हते. साहेबांना फोन करून मिटिंग लावली. मोक्कासाठी ऐकायला तयार नव्हते. 1 दिवसांत एफआयआर ड्राफ्ट करून दिला. स्वत: अभ्यास करून कलमं लावली. अनेक कलमं लावली. पण त्यांनी पॅरेच्या पॅरे गहाळ केली.
- अनिल देशमुखांनी बदल्यांमध्ये पैसे कमाविले. 100 कोटींपेक्षाही अधिक. किमान 250 कोटी तरी आहे. नुसते बदल्यांमध्ये नाही, तर वाहन खरेदी, बांधकामाचे टेंडर भरपूर मार्ग असतात. 2 वर्षांत 250 कोटी रुपये तरी कमविले असतील. काय लागतं. मुंबईत 100 तरी मोठे बिल्डर्स आहेत. प्रत्येकाने 2/3 कोटी दिले तरी 200-300 कोटी सहज जमा होतात. बिल्डर्ससाठी 2 कोटी काही मोठी रक्कम नाही. एक नक्की की, अनिल देशमुख आपल्या कामी आला असता. मी साहेबांचा माणूस. पण, माझा फोटो ठेवत नाही. संबंध दाखवित नाही, कधी स्टेटस ठेवत नाही.
What’s in the “pen drive bomb” of Fadnavis
महत्त्वाच्या बातम्या
- सट्टा बाजाराचाही योगींवरच विश्वास, उत्तर प्रदेशात भाजपावर लागला ३०० कोटी रुपयांचा सट्टा
- शेतकऱ्यांबाबत सरकार संवेदनाशून्य, उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला उर्जामंत्र्यांकडून हरताळ, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
- रशिया-युक्रेन युध्दामुळे चीनचा जीडीपी वृध्दीदर ३0 वर्षांत सर्वात कमी
- येणारे येतीलचं, पण तुमच्या नशिबी पंतप्रधान पदाची खुर्ची नाही, सदाभाऊ खोत यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर