• Download App
    ठाकरे सरकारच्या तुघलकी निर्णयाने नाट्यकर्मी संतप्त, 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करून काय उपयोग?। What is the use of starting a theater with 50 per cent capacity?

    ठाकरे सरकारच्या तुघलकी निर्णयाने नाट्यकर्मी संतप्त, 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करून काय उपयोग?

    नाट्यगृहे सुरू करण्याबाबत ठाकरे सरकारच्या तुघलकी नियमांमुळे नाट्यकर्मी संतप्त झाले आहेत. 50 टक्के क्षमता आणि एक सीट सोडून प्रेक्षकांना बसावे लागणार असल्याने कोणीही नाट्यकर्मी प्रयोग करण्याचे धाडस करणार नाही असे म्हटले आहे. What is the use of starting a theater with 50 per cent capacity?


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नाट्यगृहे सुरू करण्याबाबत ठाकरे सरकारच्या तुघलकी नियमांमुळे नाट्यकर्मी संतप्त झाले आहेत. 50 टक्के क्षमता आणि एक सीट सोडून प्रेक्षकांना बसावे लागणार असल्याने कोणीही नाट्यकर्मी प्रयोग करण्याचे धाडस करणार नाही असे म्हटले आहे.

    नाट्यकर्मींच्या म्हणण्यानुसार पुन्हा एकदा 50% प्रेक्षक आणि एक सीट सोडून अशीच नियमावली आली आहे.यामुळे कितीसे प्रेक्षक येणार आणि किती शो होणार? करमणूक क्षेत्राला व्यवसाय म्हणून सरकार दरबारी अधिकृत मान्यता नाही. पण आम्ही सिनेमा आणि नाटकांचे जे सादरीकरण करतो ते व्यवसाय म्हणूनच.हजारो लोकांची पोटं याच व्यवसायाने भरतात.या नियमावलीने व्यवसाय होणारच नसेल तर नेमक काय होईल त्या लोकांच.



    50%प्रेक्षक आणि एक सीट सोडून हे आधी करून झाले असल्याचे नाट्यनिर्माता चंद्रकांत लोहोकरे यांनी म्हटले आहे.मोजून 5-6 नाटक आणि फक्त शनिवार-रविवार चे एक – एक प्रयोग असेच घडले. या दरम्यान कुठलेच सिनेमे प्रदर्शित झाले नाहीत. त्या वेळेचे वातावरण भितीदायक नक्कीच होते… पण आत्ता लस आल्या मुळे खूप स्थिरता आली आहे. आत्ता 100% प्रेक्षक आणि दोन डोस झालेल्यांनाच प्रवेश या पद्धतीने सुरू का करत नाहीत?
    दोन डोस घेतलेल्यां ट्रेन, बस, मॉल मध्ये परवानगी दिली. गर्दी करूनही सुदैवाने सगळ सुरळीत आहे. लसींचा फायदा होतोय हे आपल्यालाच मान्य नाही का? 22 ऑक्टोबर पासून थिएटर सुरू होण्याचा कोणालाच फायदा होणार नाही… आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने उद्या सुरू झालेल बंद असल्या सारखच असेल.

    दोन – चार नाटकांचे प्रयोग आणि एखाद दुसरा सिनेमा प्रदर्शित होण म्हणजे झाल सगळ सुरू अस नाही. आर्थिक गणित जुळवताच येणार नाही. सिनेमा पहिल्या 5 रांगा मधून तर नाटक शेवटच्या 10 रांगा मध्ये बसून प्रेक्षक पहात नाहीत. त्यात उरलेल्या सीट्स मधून 50% प्रेक्षक याने गणित कसे जुळणार असा प्रश्नही त्यांनी केला आहे.22 ऑक्टोबर पासून थिएटर सुरू होणार याचा आनंद मावळला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

    What is the use of starting a theater with 50 per cent capacity?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस