• Download App
    त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? - आशिष शेलारWhat is the connection between the riots in Maharashtra after the Tripura incident and the photo of 2016-17? - Ashish Shelar

    त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? – आशिष शेलार

    भाजपने पुकारलेल्या अमरावती शहर बंद दरम्यान मोठा हिंसाचार उफाळून आला होता. या हिंसचारमुळे राजकीय वर्तुळात चांगलेच आरोप-प्रत्यारोप बघायला मिळत आहेत.What is the connection between the riots in Maharashtra after the Tripura incident and the photo of 2016-17? – Ashish Shelar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अमरावती बंद दरम्यान झालेला हिंसाचार हा भाजपचा सुनियोजित कट असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. त्याच सोबत मलिकांनी भाजप आमदार आशीष शेलार यांच्यावर देखील आरोप केले आहेत. भाजपने पुकारलेल्या अमरावती शहर बंद दरम्यान मोठा हिंसाचार उफाळून आला होता. या हिंसचारमुळे राजकीय वर्तुळात चांगलेच आरोप-प्रत्यारोप बघायला मिळत आहेत. या घटनेप्रकरणी नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

    नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर भाजप आमदार आशीष शेलार यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. आम्ही फोटो दाखवले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे सडेतोड उत्तर शेलार यांनी दिले आहे.



    ते म्हणाले, अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे.पण त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

    भाजप नेते आमदार आशिष शेलार हे रझा अकादमीच्या कार्यालयात काय करत होते, असा सवाल नवाब मलिक यांनी केला. त्यावर बोलताना शेलार म्हणाले, जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही.

    What is the connection between the riots in Maharashtra after the Tripura incident and the photo of 2016-17? – Ashish Shelar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Solapur EVM : सोलापुरात ढाब्यावर सापडलेल्या ईव्हीएमप्रकरणी आयोगाची कारवाई; राखीव ईव्हीएम मतदानातील नसल्याचा खुलासा

    ZP elections results : भाजपच नंबर 1; अजितदादांच्या राष्ट्रवादीला सहानुभूतीचा फायदा; 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता!!

    अजितदादांची पायाभरणी आणि नंतरची सहानुभूती यामुळे पुणे जिल्ह्यात चालली राष्ट्रवादीची हवा, भाजपनेही दिला होता “बाय”!!