प्रतिनिधी
नवी दिल्ली : पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्याची परवानगी देण्याबाबत आदेश देण्याच्या मागणीसाठी शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टातच्या घटनापीठासमोर आज सुनावणी झाली. घटनापीठाने 27 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले. पण दरम्यानच्या काळात धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवणे ते पुढची तारीख या सुनावणीत नेमके काय घडले?? What happened in the Supreme Court on the Shinde – Thackeray conflict
काय घडले सर्वोच्च न्यायालयात?
शिंदे गटाचे वकील अॅड. नीरज कौल यांनी निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टाने स्थिगिती दिल्याने निवडणूक आयोगाला पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेता येत नसल्याचे सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे यांचे वकील अॅड. कपिल सिब्बल यांनी सांगितले की, ज्यांच्यावर विधानसभा सदस्य अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे, त्यांना निवडणूक आयोगात धाव घेण्याचा अधिकार नाही. शिंदे गटाला निवडणूक चिन्ह मिळाल्यास सगळेच व्यर्थ होईल, असे सिब्बल म्हणाले. त्यावर कोणी आमदार असो किंवा नसो, तो पक्षावर दावा करु शकतो, असे अॅड. कौल यांनी म्हटले.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील अॅड. अरविंद दातार यांनी म्हटेल की, आम्ही आमचे संविधानिक कर्तव्य बजावत आहोत. त्याला रोखता कामा नये. कोण आमदार आहे, कोण आमदार नाही याकडे आम्ही लक्ष देत नाही. संबंधित व्यक्ती पक्षाची सदस्य असणे पुरेसे असल्याचेही त्यांनी म्हटले.
त्यानंतर न्यायालयाने संबंधित पक्षकारांना दोन पानांवर मुद्दे मांडण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी घेण्याचे जाहीर केले. या सुनावणीत सुप्रीम कोर्टात युक्तिवाद होणार आहे. सुप्रीम कोर्ट त्याच दिवशी निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत निकाल सुनावण्याची शक्यता आहे.
What happened in the Supreme Court on the Shinde – Thackeray conflict
महत्वाच्या बातम्या
- आता कारमध्ये सर्वांना सीटबेल्ट लावावा लागणार, सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर नितीन गडकरींचा निर्णय, अन्यथा लागेल दंड
- नितीश कुमारांचे मिशन 2024 : दिल्लीत 5 विरोधी नेत्यांची भेट, 13 जणांना एकत्र आणून 500 जागांवर भाजपला आव्हान देण्याचे लक्ष्य
- समान नागरी कायदा अंमलबजावणीची व्यवहार्यता तपासून उत्तर द्या; सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश
- अर्शदीपला खलिस्तानी संबोधणे : “प्रोजेक्ट केरोसीन”ने भारतात देशाची आग फैलावण्याचे पाकिस्तानी कारस्थान!!