• Download App
    वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प : सुभाष देसाई आधी काय म्हणाले?, आज काय म्हणाले?; नितेश राणेंनी केले ट्विट!! What did Subhash Desai say earlier?, What did he say today?

    वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प : सुभाष देसाई आधी काय म्हणाले?, आज काय म्हणाले?; नितेश राणेंनी केले ट्विट!!

    प्रतिनिधी

    मुंबई : सेमीकंडक्टर उत्पादक कंपनी वेदांता – फॉक्सकॉन ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे एक नवा राजकीय वाद उसळला आहे. यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर वेगवेगळ्या प्रकारे निशाणे साधले आहेत. What did Subhash Desai say earlier?, What did he say today?

    ठाकरे – पवार सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. वेदांत आणि फॉक्सकॉन कंपनीची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार याविषयीची चर्चा अनिल अग्रवाल यांच्याशी झाल्यानंतर ते उठताना हसत म्हणाले होते, गुंतवणुकी संदर्भात केंद्र सरकारची परवानगी घेतली पाहिजे. तेव्हाच माझ्या मनात शंका उत्पन्न झाली होती, असे देसाई आज म्हणाले. परंतु सुभाष देसाईंचे 7 जानेवारी 2020 चे वक्तव्य, जे टाइम्स ऑफ इंडियाच्या वेब पोर्टलवर प्रसिद्ध झाले होते, त्याचे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ शकत नाहीत, असे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वतःच सांगितले असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी त्या बातमीचा हवाला देऊन दाखविले आहे.

     ठाकरे-देसाईंचा आरोप

    वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा हा प्रकल्प तब्बल 1 लाख 54 हजार कोटी रुपयांचा असून यामुळे राज्यात एक लाखांपेक्षा जास्त जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाल्याचा आरोप सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

     नितेश राणेंचे ट्वीट

    पण आता याबाबत आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत 2020 सालच्या बातम्यांचा संदर्भ दिला आहे. ज्यामध्ये सुभाष देसाई यांनीच हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारणे शक्य नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे महाराष्ट्रापुढे आधी कबुली आणि मग भूलथापा…ही आहे ‘फसवी’ आदित्य सेना…ये पब्लिक है सब जानती है…, अशा शब्दांत राणेंनी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाईंवर निशाणा साधला आहे.

    What did Subhash Desai say earlier?, What did he say today?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ