• Download App
    एसटी कर्मचारी संप ,विलीनीकरणाबाबत काय म्हणाले अजित पवारWhat did Ajit Pawar say about ST workers' strike and merger?

    एसटी कर्मचारी संप ,विलीनीकरणाबाबत काय म्हणाले अजित पवार

    सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.What did Ajit Pawar say about ST workers’ strike and merger?


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मागील दोन तीन आठवड्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती की परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचं शासनात विलीनीकरण करावं.परंतु सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.



    यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या संपात आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता ही मागणी आली आहे. तुमचं विलीनीकरण केलं तर उद्या कोतवाल आणि पोलीस पाटीलही पुढे येतील, असं सांगतानाच तुटेपर्यंत ताणू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

    पुढे अजित पवार म्हणाले की , विलीनीकरणाचं प्रकरण उच्च न्यायालयात आहे. हायकोर्टाने समिती स्थापन केली आहे.त्यामुळे थोडं थांबलं पाहिजे. एसटीच्या संपात पगारवाढीची मागणी होती. आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता मात्र ही मागणी पुढे आली आहे. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण केलं तर उद्या पोलीस पाटील आणि कोतवालही पुढे येतील, असं पवार म्हणाले.

    What did Ajit Pawar say about ST workers’ strike and merger?

    Related posts

    Radhakrishna Vikhe Patil, : विखे पाटलांची घणाघाती टीका- आज समाजात दुही, विसंवाद व संघर्ष; या पापाचे धनी शरद पवार

    Bawankule : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह; जागा निश्चितीसाठी 28 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम

    ATS Raids : टेरर फंडिंगप्रकरणी पुण्यात एटीएसचे छापे; 18 जण ताब्यात, 2 वर्षांपूर्वी अटक झालेल्या अतिरेक्याकडून सुगावा