• Download App
    Week long Large scale programs for Veer Savarkar jayanti in maharashtra

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच सावरकर जयंतीचा आठवडाभर प्रचंड धुमधडाका!!

    प्रतिनिधी

    पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती शासकीय पातळीवर 28 मे 2023 रोजी साजरी होणार आहे. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी शिंदे – फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. सावरकर प्रेमींमध्ये त्यामुळे प्रचंड उत्साहाचे वातावरण असून आजपासून म्हणजे 21 मे 2023 पासून संपूर्ण आठवडाभर पुणे, मुंबई नाशिक, रत्नागिरी, परभणी सह सर्व महाराष्ट्रात सावरकर जयंतीचा धुमधडाका सुरू होणार आहे. Week long Large scale programs for Veer Savarkar jayanti in maharashtra

    संपूर्ण आठवडाभर सावरकर दौड ते सावरकरांच्या विषयीची व्याख्याने, नाटके, संगीत कार्यक्रम, काव्यवाचन, त्यांच्या पुस्तकांचे अभिवाचन अशा कार्यक्रमांची रेलचेल सुरू होणार आहे.

    काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये सावरकर प्रेमी विविध मंडळांच्या एक मेळावा झाला होता. त्यामध्ये हर घर सावरकर हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यक्रमाला शिंदे – फडणवीस सरकारमधील मंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यात सरकारी कार्यक्रमाबरोबरच संस्थात्मक कार्यक्रमांची रूपरेषा ही ठरवली होती. सर्वसाधारणपणे या रूपरेषेवर आधारित संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम होणार आहेत यापैकी काही कार्यक्रम असे :

    रत्नागिरीत सावरकर विचार जागरण सप्ताह

    शोभायात्रा, सहभोजन
    वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा

    महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि मुंबईतील विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह रंगणार आहे. वीरभूमी परिक्रमेअंतर्गत हा सोहळा येत्या २१ ते २८ मे दरम्यान होणार आहे. वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, पथनाट्ये, वाळूशिल्प यांसह विनायका रे हा संगीतमय कार्यक्रम, शोभायात्रा आणि सहभोजन कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी शहरात करण्यात आले आहे.

    या सर्व कार्यक्रमांकरिता पतितपावन मंदिर संस्था, भागोजीशेठ कीर ट्रस्ट आणि विठ्ठल मंदिर देवस्थान यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे सहकार्य लाभत आहे. नियोजनाकरिता समितीही गठित करण्यात आली आहे.

    *या सप्ताहाची सुरवात २१ मे रोजी सकाळी ९ वाजता स्वा. सावरकर चौक ते हनुमान मंदिर, शिरगाव इथपर्यंत बाईक रॅलीने करण्यात येणार आहे. यात शेकडो दुचाकीस्वार सहभागी होतील. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहामध्ये त्या तिघी (स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा) हे सावरकर कुटुंबातील महिलांच्या त्यागाचे मूर्तीमंत प्रतिक दाखवणारे नाट्य सादर होईल. पुण्यातील अभिव्यक्त संस्थेतर्फे याचे सादरीकरण होणार आहे.

    २२ मे रोजी सकाळी ११ वाजता रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन पतितपावन मंदिरात सुरू होईल.

    २३ मे रोजी सकाळी ११ वाजता आठवडा बाजार व नंतर स्वा. सावरकर चौक येथे देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी वीर सावरकरांवर आधारित पथनाट्य सादर करतील.

    २४ मे रोजी सकाळी ११ वाजता विठ्ठल मंदिर येथे वक्तृत्व स्पर्धा होणार आहे.

    गुरुवारी (ता. २५) रेल्वेस्टेशन आणि मारुती मंदिर चौक येथे पथनाट्य सादर केले जाणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा यांचे कीर्तन साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोड येथील ओम साई मित्रमंडळाच्या हॉलमध्ये होणार आहे.

    २६ मे रोजी वाळूशिल्प भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर शिल्पकार अमित पेडणेकर साकारणार आहेत.* सायंकाळी ६ वाजता त्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
    सप्ताहात असे विविध कार्यक्रम होत असताना स्वा. सावरकरांच्या गीते, कवितांवर आधारित विनायका रे… हा संगीतमय कार्यक्रम २७ मे रोजी सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात (वातानुकूलित) रंगणार आहे. लिटिल चॅंप फेम आणि रत्नागिरीचा सुपुत्र गायक प्रथमेश लघाटे व आघाडीची गायिका मुग्धा वैशंपायन वीर सावरकरांचे गीते सादर करणार आहेत.

    वीर सावरकरांची १४० वी जयंती येत्या २८ मे रोजी आहे. या जयंतीचे औचित्य साधून आठवडाभर विविध कार्यक्रम होत असून त्याची सांगता २८ मे रोजी होणार आहे. या दिवशी सकाळी ९ वाजता मध्यवर्ती कारागृह स्वा. सावरकर स्मारक येथून जयस्तंभ, एसटी स्टॅंड, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिर येथे शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे दहा संस्थांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. याकरिता नियोजन करण्यात येत आहे. हिंदुत्ववादी संस्थांसह मंदिर संस्था, ज्ञाती संस्थाही यात सहभागी होणार आहे. ही शोभायात्रा विराट होईल, याकरिता संयोजकांनी तयारी केली आहे.

    ही शोभायात्रा पतितपावन मंदिरात पोहोचली की तेथे ११.३० वाजता सहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. शोभायात्रेमध्ये पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हेसुद्धा सहभागी होणार आहेत.

    या सर्व कार्यक्रमांना रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यटन संचालनालय, पतितपावन मंदिर संस्था, श्री. भागोजीशेठ कीर ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठ यांच्यावतीने करण्यात येत आहे.

    Week long Large scale programs for Veer Savarkar jayanti in maharashtra

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस