विनायक ढेरे
नाशिक : अफगाणिस्तानात तालिबानने सर्वंकष कब्जा केल्यानंतर तेथे स्वतःचे सरकार अधिकृतरित्या स्थापित करण्याच्या हालचाली तालिबानने सुरू केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या मूळच्या कट्टर धर्मांध चेहऱ्यावर सौम्य, उदारमतवादी मुखवटा धारण केला आहे. सौम्य या अर्थाने की तालिबानने जगातील सर्व देशांना आपले धोरण बदलल्याचा विश्वास देण्याचा प्रयत्न चालविला आहे. We would like to assure our neighbours & regional countries that we’ll not allow our territory to be used against any country in the world
महिला विषयक धोरण बदलून इस्लामी कायद्यानुसार महिलांना कामाचे स्वातंत्र्य देणे, जगभरातील सर्व राष्ट्रांच्या दूतावासांना संरक्षण पुरवणे, कोणत्याही दूतावासातील कोणत्याही अधिकारी – कर्मचाऱ्याला त्रास न देणे, अशा स्वरूपाची आश्वासने तालिबानने द्यायला सुरुवात केली आहे. प्रवक्ते तालिबानचे प्रवक्ते प्रवक्ते दररोज यासाठी काबूलमध्ये पत्रकार परिषदा घेत आहेत.
इतकेच नाही तर तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याही शेजारी देशांच्या विरोधात कारवाया करण्यासाठी करू दिला जाणार नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाने याबद्दल तालिबान राजवटीत करून आश्वस्त असावे, अशी खात्री देण्याचा पत्रकार परिषदेत प्रयत्न केला आहे. तालिबानची आधीची राजवट आणि इथून पुढे सुरू होणारी राजवट यात मोठा फरक असल्याचा दावा त्याने केला आहे.
आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि समुदाय जसा बदलला आहे तसा तालिबानच्या मानसिकतेतही बदल झाला आहे. इस्लामी विचार चौकट जरी कायम असली तरी व्यवहारात बदल झाला आहे, असा दावा त्याने केला आहे.
तालिबानच्या इथून पुढच्या राजवटीत अधिक अनुभवी नेते आणि अफगाणिस्थान मधल्या सर्व समूहांचे प्रतिनिधी सरकारमध्ये असतील. सर्व समूहांना राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत सामावून घेतले जाईल. असे मुजाहिद याने सांगितले आहे.
महिला धोरणाच्या बाबतीत इस्लामी कायद्याची चौकट कायम राहील. परंतु त्यांना काम करण्याची परवानगी दिली जाईल. आरोग्य क्षेत्रासारख्या सेवा क्षेत्रांमध्ये अफगाण महिला काम करू शकतील, असे तो म्हणाला.
…पण विश्वास कसा ठेवणार??
पण हे सगळे कशासाठी चालले आहे, तर तालिबान्यांना आता अफगाणिस्तानात आपल्या राजवटीचा पायरोवा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अधिमान्यतेची जरुरत आहे. कॅनडाने आत्ताच तालिबानी राजवटीला मान्यता देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अन्य देश ही आपल्या राजवटीला मान्यता देणार नाहीत. आपल्या धोरणात बदल केला नाही तर आपली प्रतिमा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणूनच कायम राहील याची तालिबान्यांना खात्री आहे. आणि म्हणूनच त्यांनी हा सौम्य मुखवटा धारण केला आहे.
बंडखोर म्हणून हल्ले करणे ठीक आहे. परंतु अफगाणिस्तानात दीर्घकाळ राजवट टिकवायची आणि चालवायची असेल तर पैसा लागेल. निधी लागेल. आजच्या सोशल मीडियाच्या प्रभावाच्या जगात आंतरराष्ट्रीय अधिमान्यता लागेल. याची जाणीव तालिबान्यांना झाली आहे. म्हणूनच त्यांनी हा सौम्य मुखवटा धारण केला आहे.
भारताची गुंतवणूक तालिबान्यांना मान्य आहे. यासाठीच भारताने धरणे बांधावीत, शाळा बांधाव्यात, अन्य सुविधा द्याव्यात हे तालिबानला मान्य आहे. परंतु भारतीय लष्कर येथे ठेवू नये, अशी त्यांनी धमकी दिली आहे. चीन देखील तालिबान्यांना शस्त्रास्त्रे विकायला तयार आहे. परंतु, गुंतवणुकीबाबत मात्र सावध पावले टाकताना दिसत आहे. तरी देखील एकट्या चीनची अधिमान्यता मिळवून तालिबानची राजवट टिकू शकत नाही, याची तालिबान्यांना जाणीव आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कट्टर इस्लामी चेहऱ्यावर सौम्य मुखवटा धारण करून दररोज पत्रकार परिषदा घेऊन आंतरराष्ट्रीय समुदायाला तालिबान बदलल्याचा संदेश द्यायला सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर यातून #sympathiserstaliban असले हँशटँग ट्रेंड होताना दिसत आहेत. पण एकूण तालिबानने आपल्या कट्टर धर्मांध चेहऱ्यावर सौम्य उदारमतवादी मुखवटा धारण करण्याची मूळ कारणे वर लिहिली आहेत.
We would like to assure our neighbours & regional countries that we’ll not allow our territory to be used against any country in the world
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
- शबरीमला मंदिरात वडिलांसोबत दर्शनास जाण्याची अल्पवयीन मुलीला परवानगी
- मराठवाड्यात सर्वदूर बरसल्या श्रावणधारा, पावसामुळे पिकांना मिळाले जीवदान
- महाराष्ट्र ठरले एक कोटी जनतेला दोन्ही डोस देणारे देशातील पहिले राज्य
- राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल