विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : महाराष्ट्र राज्यात सध्या राजकीय वर्तुळात बऱ्याच मोठय़ा घटना घडत आहेत. गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांवर नुकताच आटपाडी तालुक्यात हल्ला झाला होता. या हल्ल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे.
We will not tolerate any harm to Gopichand Padalkar’s , Leader of Opposition Devendra Fadnavis warns government
पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतल्यानंतर बोलताना ते म्हणतात, लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु राज्य सरकार भाजप पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. हे विरोधी पक्षचं काम असते की सरकार विरूध्द बोलणे. सरकारचे घोटाळे बाहेर काढणे.
म्हणूनच भाजपला लक्ष्य केलं जातंय. सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा द्यावी. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही. आणि याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल. त्यामुळे सरकारने सुरक्षा दिली पाहिजे. असे फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.
We will not tolerate any harm to Gopichand Padalkar’s , Leader of Opposition Devendra Fadnavis warns government
महत्त्वाच्या बातम्या
-
- ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध
- प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी
- रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला
- अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा
- भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल