• Download App
    कॉँग्रेस सोडली कारण अशोक चव्हाण दिल्लीत चुकीची फिल्डिींग लावली होती, निलेश राणे यांचा आरोप|We left the Congress because Ashok Chavan had fielded incorrectly in Delhi, Nilesh Rane alleged

    कॉँग्रेस सोडली कारण अशोक चव्हाण दिल्लीत चुकीची फिल्डिींग लावली होती, निलेश राणे यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आमच्या विरोधात अशोक चव्हाण चुकीची फिडींग दिल्लीत लावत होते, म्हणून कंटाळून आम्ही काँग्रेस सोडली. अशोक चव्हाण तेव्हा तसे वागले नसते तर तो निर्णय घेतला नसता, असे भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी म्हटले आहे.We left the Congress because Ashok Chavan had fielded incorrectly in Delhi, Nilesh Rane alleged

    शिवसेनेकडून पत्रकार परिषदेत घेत खासदार विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर कॉँग्रेसने कारवाई केली होती असा आरोप केला होता. यावर निलेश राणे म्हणाले, आमच्यावर कोणती कारवाई होती विनायक राउत यांनी सांगावं, नाहीतर राजकारण सोडावं. ते पुराव्याच्या आधारावर कधी बोलत नाहीत.



    नेते पद नव्हत तरी त्यांना राणे साहेबांना बाळासाहेबांना मुख्यमंत्री केले. विनायक राऊतांना साधे मंत्रीही नाही केलं. राणे साहेबांच काय वजन आहे शिवसेनेत ते 2005 साली आणि त्या आधीच दाखवलं आहे. विनायक राउत यांनी स्वत:चे वजन बघावे.

    उध्दव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलींद नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल करताना निलेश राणे म्हणाले, मिलिंद नार्वेकर यांना बसायला जागा नसायची.ते मागे उभे असायचे. शिवसेनेत तिकिट विकणारा जर कोण एजंट असेल तर तो मिलिंद नार्वेकर, अशा शब्दात त्यांनी नार्वेकरांचा समाचार घेतला आहे.

    नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांना फोन केला होता या आरोपावर निलेश राणे म्हणाले, साहेबांनी फोन केलाही असेल तर काय अडचण आहे का? उद्धव ठाकरे हे का पाकिस्तानचे आहेत का? फोन करण्यात काय चुकलं? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच मेन कलाकार बघून घेतील, हे साईड अ‍ॅक्टरचे काम नाही.

    We left the Congress because Ashok Chavan had fielded incorrectly in Delhi, Nilesh Rane alleged

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ