• Download App
    "खोलवर शिरून" बाॅलिवूडला खणती लावायला सुरुवात; बड्या धेंडांना नार्कोटिक्स ब्यूरो सोडणार नाही!! । We are acting in an impartial manner. In the process, if some connections to Bollywood or rich people emerge, so be it. We have to act within the purview of the law: NCB chief SN Pradhan on the seizure of drugs from a party at a cruise off Mumbai coast

    “खोलवर शिरून” बाॅलिवूडला खणती लावायला सुरुवात; बड्या धेंडांना नार्कोटिक्स ब्यूरो सोडणार नाही!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : गोवा क्रूज रेव्ह पार्टीत बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेऊन नार्कोटिक्स ब्युरोने बॉलिवूडला खणती लावायला सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. सुशांत सिंग रजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर सुरू झालेली तपास मोहीम वेगवेगळ्या दिशांना जाऊन आता बॉलिवूडमध्ये “खोलवर” शिरत चालली आहे. आणखी बडी धेंडे सापडणे आता दूर नाही हेच यातून स्पष्ट होत आहे. We are acting in an impartial manner. In the process, if some connections to Bollywood or rich people emerge, so be it. We have to act within the purview of the law: NCB chief SN Pradhan on the seizure of drugs from a party at a cruise off Mumbai coast

    आता बड्या धेंडांना देखील नार्कोटिक्स ब्यूरो सोडणार नाही, असा सूचक नव्हे, तर स्पष्ट इशारा नार्कोटिक्स ब्यूरोचे प्रमुख आर. एन. प्रधान यांनी देऊन बॉलिवूडमध्ये “खोलपर्यंत” हात घालण्याची तयारीच एक प्रकारे सूचित केली आहे.

    आत्तापर्यंत ड्रग्स – बॉलिवूड कनेक्शन मध्ये नार्कोटिक्स ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे हे तपासात आघाडीवर असायचे. गोवा क्रूज प्रकरणात ते तपासात आहेतच. पण त्याही पेक्षा नार्कोटिक्स ब्यूरोचे प्रमुख आर. एन. प्रधान या प्रकरणात ऍक्टिव्ह झाल्याने ड्रग्स – बॉलिवूड कनेक्शन पूर्ण खोलून काढायला सुरुवात झाल्याचे मानण्यात येते आहे.



    गुप्तचरांचे इनपुट्स, योग्य दिशेने केलेला तपास आणि आता इथून पुढे होणारी चौकशी आणि तपास याविषयीचे स्पष्ट खुलासे जेव्हा प्रधान यांच्यासारखे अतिवरिष्ठ अधिकारी करतात, तेव्हा याविषयीच्या कायदेशीर गंभीर कारवाईची कल्पना येऊ शकते.

    बॉलिवुडची कितीही मोठी कनेक्शन्स असोत किंवा श्रीमंत लोक असोत कायदेशीर कारवाई होणारच, असे प्रधान यांनी स्पष्ट करून आता द्रक्स प्रकरणात नार्कोटिक्स डिपार्टमेंटने घातलेला हात बॉलीवूडमध्ये “अधिक खोल” जाईल, असेच एक प्रकारे सूचित केले आहे. यातून जी नावे पुढे येतील ती श्रीमंत धेंडाची असतील, असेच त्यांना म्हणायचे आहे. बॉलिवूडमध्ये सुपरस्टार वगैरे बिरुदे मिरवणारी माणसे किती तकलूपी आहेत. या माणसांचे सुपरस्टार पदाचे बुरखे यातून फाटणार आहेत

    सुशांत सिंग राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सुरू झालेली मोहीम आता शाहरुख खानच्या मुला पर्यंत येऊन ठेपली आहे. यापुढे तिचा वेग वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण सडलेले बॉलिवूड पूर्णपणे “खोलल्याशिवाय” नार्कोटिक्स ब्यूरो आणि अन्य केंद्रीय तपास संस्था स्वस्थ बसणार नाहीत, हेच प्रधान यांच्या परखड वक्तव्यातून स्पष्ट होत आहे.

    We are acting in an impartial manner. In the process, if some connections to Bollywood or rich people emerge, so be it. We have to act within the purview of the law: NCB chief SN Pradhan on the seizure of drugs from a party at a cruise off Mumbai coast

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस