• Download App
    सीआयडी मालिका पाहून अल्पवयीन मुलांनी केला खून, 70 वर्षीय महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले ।Watching the CID series minors murdered 70-year-old woman

    सीआयडी मालिका पाहून अल्पवयीन मुलांनी केला खून, 70 वर्षीय महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले

    सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या 70 वर्षीय महिलेचा खून 14 आणि 16 वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांनी केल्याचे उघड झाले आहे. सीआयडी ही मालिका पाहून त्यांनी हा खून केल्याचा धक्कादायक प्रकार यातून समोर आला आहे. Watching the CID series minors murdered 70-year-old woman


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या 70 वर्षीय महिलेचा खून 14 आणि 16 वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांनी केल्याचे उघड झाले आहे. सीआयडी ही मालिका पाहून त्यांनी हा खून केल्याचा धक्कादायक प्रकार यातून समोर आला आहे.

    शालिनी बबन सोनवणे (वय 70, रा. सायली हाईटस फ्लॅट नं.०७ हिंगणे खुर्द) या महिलेचा खून झाला होता. त्यांच्या घरामधील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरी करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पोलिसांना घनास्थळाजवळील रोकडोबा मंदिरा जवळ लहान मुलांच्या कडुन माहिती मिळाली की 30 ऑक्टोबर रोजी दुपारी पाणी पुरी खायला जाताना त्याचे दोन मित्र पाणीपुरी न खाताच परत गडबडीने घरी आले होते. पोलिसानी या मुलांचे घाई गडबडीत जाण्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. त्यांच्यावर संशय बळावल्याने त्यांच्याकडे विचारपूस केली उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र त्यातील एका मुलाला स्वत:च्याच घरामध्ये चोरी करण्याची सवय असल्याबाबत माहिती समोर आली. या मुलांकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिली.



    या मुलांचे शालिनी सोनवणे यांचा घरात येणे जाणे होते. या महिलेकडे खुप पैसे असतात व ते पैसे कोठे ठेवतात याबाबत माहिती होती. दोन महिन्यापुर्वच त्यांनी सीआयडी मालिका पाहून चोरी करण्याचा कट रचुन घराची चावी चोरली होती. पंरतु, शालिनी या वयस्कर असल्याने त्या घर सोडुन कोठेही जात नव्हत्या. त्यामुळे त्यांना चोरी करता येत नव्हती. त्यानंतर त्यांनी शालिनी या घरात असतानाच चोरी करण्याची योजना आखली. तसेच या महिलेने विरोध केला तर त्यांना ठार मारण्याची तयारी ठेवली होती.

    घटनेच्या दिवशी दुपारी दीडच्या सुमारास ही मुले चोरीच्या उद्देशाने घरात घुसली. त्यावेळी शालिनी या टी.व्ही पाहत होत्या. ही मुले देखील टी.व्ही पाहू लागली. शालिनी यांचे लक्ष नसताना त्यांना पाठीमागून ढकलुन देण्यात आले. त्याचे तोंड व नाक दाबुन खून करण्यात आला. त्यानंतर कपाटातील ९३ हजार रुपये रोख, ६७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख ६० हजार रुपायांचा मुद्देमाल नेला होता.
    हा गुन्हा करताना सीआयडी मालिका पाहुन आपल्या हाताचे ठसे कोठे उमटु नयेत याकरीता हॅण्डग्लोजचा वापर केला होता. मुलांनी चोरलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

    Watching the CID series minors murdered 70-year-old woman

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    फडणवीस सरकारमध्ये राहून पवार संस्कारितांच्या गेमा; भाजपच्या मंत्र्यांना बदनाम करा!!

    Dhananjay Munde : माजी मंत्री धनंजय मुंडेंना 42 लाखांचा दंड का झाला ?

    सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार OBC आरक्षणासह स्थानिक निवडणुका होणार म्हणजे नेमके काय घडणार??, मुख्यमंत्री फडणवीसांनी समजावून सांगितला अर्थ!!