• Download App
    WATCH : पोलिसांनी भरल्या ताटावरून राणेंना उठवलं? प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप, म्हणाले- 'तुम्ही साहेबांचा रस्त्यात खून कराल!' । Watch Video Prasad Laad on Narayan Rane Arrest Says they Want To Kill Him, Rane Health Also Not Well

    WATCH : पोलिसांनी भरल्या ताटावरून राणेंना उठवलं? प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप, म्हणाले- ‘तुम्ही साहेबांचा रस्त्यात खून कराल!’

    Narayan Rane Arrest : केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा संगमेश्वरमध्ये आली होती. नारायण राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्याने त्यांना अटक करण्यासाठी रत्नागिरी पोलीस संगमेश्वरमध्ये आले. राणे जेवत असतानाच पोलिसांनी तेथे प्रवेश केला आणि अटकेची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे भाजप नेते नितेश राणे आणि नीलेश राणे संतापले. या घटनेचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे. Watch Video Prasad Laad on Narayan Rane Arrest Says they Want To Kill Him, Rane Health Also Not Well


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा संगमेश्वरमध्ये आली होती. नारायण राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्याने त्यांना अटक करण्यासाठी रत्नागिरी पोलीस संगमेश्वरमध्ये आले. राणे जेवत असतानाच पोलिसांनी तेथे प्रवेश केला आणि अटकेची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे भाजप नेते नितेश राणे आणि नीलेश राणे संतापले. या घटनेचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे.

    भाजप नेते प्रसाद लाड यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ 57 सेकंदांचा आहे. त्यात एका खोलीत नारायण राणे खुर्चीवर बसून जेवताना दिसत आहेत. खोलीत एक डॉक्टरही आहेत. सोबत नीलेश आणि नितेश राणेही आहेत. तसेच प्रसाद लाड आणि इतर काही कार्यकर्तेही दिसत आहेत. त्याच वेळी काही पोलीस आत शिरले आणि त्यांनी राणेंना अटक करण्यात येत असल्याचं सांगितलं. चार पोलीस आत शिरल्यानंतर त्यांना नीलेश राणे सामोरे गेले. आणि पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

    भाजप नेते प्रसाद लाड यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केला आहे. तुम्ही साहेबांचा रस्त्यात खून करणार आहात, असे ते म्हणाले. दुसरीकडे, नितेश-नीलेश राणेंसह पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन सुरू झाले. अटक वॉरंट आणि नोंदी दाखवण्याची मागणी करण्यात आली. जोपर्यंत नोंदी दाखवणार नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही, साहेबांच्या जीविताला धोका आहे, साहेबांना तुम्ही रस्त्यात मारणार आहात, खून करणार आहात, असा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.

    अटकेवेळी काय घडलं?

    पोलीस राणेंना अटक करण्यासाठी आल्यानंतर ऑर्डर दाखवा. आधी मला ऑर्डर दाखवा. नंतरच साहेबांना अटक करा, असं नीलेश राणे पोलिसांना बोलताना दिसले. तुम्ही साहेबांना हात का लावणार. साहेबांना हात नाय लावायचा. कधीपासून तुमचं हे चाललं आहे. कधीपासून गप्प बसायचं? आधी वॉरंट ऑर्डर दाखवा मगच साहेबांना अटक करा, असं नीलेश राणे बोलताना दिसत आहेत. तेवढ्यात एकजण एक मिनिट साहेब जेवत आहेत, असं म्हणताना दिसत आहे.

    नारायण राणेंची प्रकृती खालावली, डॉक्टर म्हणाले, रुग्णालयात दाखल करावे लागेल

    या सर्व गोंधळादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. डॉक्टर म्हणाले, सॅच्युरेशन नॉर्मल आहे. बीपी वाढलेला आहे, वय पाहता बीपी वाढला आहे, ते डायबिटीजचे पेशंट आहेत, ईसीजी आणि अॅडमिशन आवश्यक आहे. बीपी वाढल्यामुळे राणेंना रुग्णालयात अॅडमिट करावं लागेल, त्यानंतर पुढील ट्रीटमेंट द्यावी लागेल, असंही डॉक्टरांनी सांगितलं.

    Watch Video Prasad Laad on Narayan Rane Arrest Says they Want To Kill Him, Rane Health Also Not Well

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य