• Download App
    WATCH : प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्र्याना पत्र हीसुद्धा भाजपची चाल - हसन मुश्रीफ । WATCH NCP Minister Hasan Mushrif Criticizes BJP Over MLA Sarnaik Letter To CM Thackeray

    WATCH : प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्र्याना पत्र हीसुद्धा भाजपची चाल – हसन मुश्रीफ

    NCP Minister Hasan Mushrif  : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ही सुद्धा भाजपची चाल आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केली. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रताप सरनाईकांच्या पत्रावरून महाविकास आघाडीमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी मी बोलत असल्याचं ते म्हणाले. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहेत, असा आरोप प्रताप सरनाईकांनी केला आहे. त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले, “सरनाईकांनी असा आरोप केला असला तरी राज्यात कुठेही तशी परिस्थिती नाही. कोल्हापूर जिल्हापरिषद गोकुळमध्ये शिवसेनेला संधी दिली. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नावरून कुरबुरी झाल्या असतील याचा अर्थ फोडाफोडी चालली आहे असा नाही. प्रताप सरनाईक यांचं हे कारण जुजबी असावं, असंही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भाजपकडून सुडाचं राजकारण सुरू आहे. शिवसेनेचे वाघ अशा धमक्यांना घाबरणारे नाहीत. भाजपकडून ज्या धमक्या दिल्या जात आहेत, त्याला सेना घाबरणार नाही. एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असा करार झालाय का असा प्रश्न हसन मुश्रीफ यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच, त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी आहे. परंतु शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे. WATCH NCP Minister Hasan Mushrif Criticizes BJP Over MLA Sarnaik Letter To CM Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना