Minister Bacchu Kadu : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवैध संपत्तीची माहिती ईडीला देणार आहे, कारण त्यांची संपत्ती विदेशात आहे, असा खळबळजनक आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता, यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच नाही तर श्रीमंत, अधिकारी यांच्यासह देशातील सर्व नेत्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. संपत्ती वाईट मार्गाने कमावली की कुठल्या मार्गाने हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं या देशातल्या सगळ्या नेत्यांची तपासणी चौकशी केली पाहिजे. जसं शेतकऱ्यांवर सीलिंग लावलं, तसं संपत्तीवर सीलिंग लावले पाहिजे व ही संपत्ती गरिबांना वाटून दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. दुसरीकडे, कोरोनामुळे शाळा व महाविद्यालये गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे आता शाळा कशा सुरू होणार व केव्हा सुरू होणार ही प्रतीक्षा पालकांसह विद्यार्थ्यांना लागली. यावर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. जे गाव कोरोनामुक्त आहे तेथे शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, कोरोनामुक्त गाव जरी असलं तरी ते गाव कोरोनाग्रस्त होऊ शकते त्यामुळे त्याची भीती आहे. त्यामुळे माणूस महत्त्वाचा आहे, आरोग्य महत्त्वाचे आहे, कशा पद्धतीने शिक्षण सुरू करता येईल हा तर सर्वांचाच प्रश्न आहे. मात्र शाळा सुरू करताना मोठं धाडस करावं लागेल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय. WATCH Minister Bacchu Kadu Says Seize All Politicians Property And Distribute in Poor
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांबाबत ईडीने केले धक्कादायक खुलासे, आणखी कोण-कोण आहेत रडारवर, वाचा सविस्तर…
- क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा, टी-२० विश्वचषक भारतात होण्याची शक्यता धुसर, जय शाह यांचे स्पष्टीकरण
- आंध्र प्रदेश राज्यसेवा आयोगाची मोठी घोषणा, सर्व परीक्षांसाठीच्या मुलाखती यापुढे बंद केल्याचा आदेश
- गोल्ड जिंकल्यास ३, तर सिल्व्हर मेडल जिंकल्यावर २ कोटींचे बक्षीस, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- पश्चिम बंगालमध्ये लवकरच लॉन्च होणार Student Credit Card, शिक्षणासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत लोन