Nilesh Rane Criticized Maha Vikas Aghadi Govt : महाराष्ट्रामध्ये तिघांचे सरकार आहे आणि तिघेही लबाड आहेत. या तीन लबाड पक्षांना भाजपला सामोरे जायचे आहे. आक्रमक झाल्याशिवाय शिवसेनेला कळत नाही. आम्ही त्या औलादींना ओळखतो. त्यांना तीच भाषा कळते, अशी खरमरीत टीका नीलेश राणे यांनी केली. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते. नीलेश राणे पुढे म्हणाले की, तो एक बिनकामाचा संजय राऊत बसलाय.. रोज उठून जॅकेट घालून तोच पत्रकार, तोच दांडा, त्याला दुसरे कामच नाही. पीआर एजन्सी काम करते. महाविकास आघाडी नाही, अशी टीका राणे यांनी केली. शिवसेना नुसती बोंबाबोंब करत असते. एवढ्या वर्ष तेच केले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला. मराठी माणूस किती राहिला आहे. मुंबई पालिका म्हणजे शिवसेना, त्याचा काय धंदा आहे. उद्धव ठाकरे कुठे धंद्यावर बसला आहे का. काय धंदा म्हणजे मुंबई पालिका अशी टीकाही त्यांनी केली. Watch BJP Leader Nilesh Rane Criticized Maha Vikas Aghadi Govt
महत्त्वाच्या बातम्या
- Pocket Ventilator : कोरोना रुग्णांसाठी बंगालच्या डॉक्टरने बनवले पॉकेट व्हेंटिलेटर, वजन फक्त 250 ग्रॅम, अशी आहेत वैशिष्ट्ये
- चेन्नईत स्वघोषित आध्यात्मिक गुरू शिवशंकर बाबाविरुद्ध गुन्हा दाखल, विद्यार्थिनींचा लैंगिक शोषणाचा आरोप
- WATCH : पाहता-पाहता जमिनीत गडप झाली अख्खी कार, मुंबईतील पावसानंतर व्हिडिओ झाला व्हायरल
- मुंबई एनसीबीने ड्रग्जपासून केक बनवणारी टोळी पकडली, एका पीसची 1000 रुपयांना विक्री
- पँगाँग तलावात गस्तीसाठी सैन्याला स्पेशल बोट्स मिळण्यास सुरुवात, लडाखमध्ये भारताची स्थिती आणखी मजबूत