• Download App
    हिंदूत्वाला विरोध करणाऱ्या कॉँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का? प्रसाद लाड यांचा सवाल Wasn't it a shame to join hands with the Congress which opposes Hindutva? Question by Prasad Lad

    हिंदूत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का? प्रसाद लाड यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का, असा सवल भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. बेळगावचा विजय हिंदुत्वाचा विजय आहे. बेळगावचा विजय मराठी माणसांचा विजय आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. Wasn’t it a shame to join hands with the Congress which opposes Hindutva? Question by Prasad Lad

    बेळगाव महापालिका निवडणुकीत एकीकरण समितीचा पराभव झाला होता. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर नाव न घेता टीका केली होती. बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसे गेली अन तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले होते.



    लाड यांनी त्याला प्रत्युत्तर देत काँग्रेसने सातत्याने मराठी माणूस आणि हिंदुत्वाला सातत्याने विरोध केला. त्या काँग्रेसशी हातमिळवणी करून पेढे वाटताना लाज वाटली नव्हती का, असा थेट सवाल केला आहे. भाजपला हिंदुत्वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि मराठी माणसांचा कधी विसर पडणार नाही. बेळगावचा पराभव संजय राऊत यांच्या जिव्हारी लागला आहे. मला एकच गोष्ट संजय राऊतांना विचारायची की, ज्या मराठी माणसाचा आणि हिंदुत्वाचा काँग्रेसने सातत्याने विरोध केला. त्या काँग्रेसबरोबर हात मिळवणी करून पेढे वाटताना त्यांना लाज वाटली नाही का? काँग्रेसशी हात मिळवणून करून त्यानी हिंदुत्वाचा अपमान केला नाही का?

    बेळगावचा विजय झांकी है मुंबई अभी बाकी है. भाजपचा विजय आणि शिवसेनेचा पराजय मुंबईला राऊतांना दिसायला लागला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, वसई, विरारसह इतर ठिकाणीही मराठी माणूस भाजपसोबत खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास व्यक्त करत जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे खंबीरपणे उभी असून, पाठीत खंजीर कोणी घुसवला त्यांनाच माहीत आहे. निवडणूक एकत्र लढवून शरद पावरांशी हात मिळवणून कोणी केली हे जगजाहीर आहे, असेही लाड यांनी म्हटले आहे.

    Wasn’t it a shame to join hands with the Congress which opposes Hindutva? Question by Prasad Lad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस