प्रतिनिधी
मुंबई : येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लावलेत “करोना निर्बंध”, परंतु संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेसाठी मात्र शिवसेना भवन झाले “कोरोना मुक्त” अशी स्थिती आज शिवसेना भवनावर दिसली.Was Shiv Sena Bhavan used for Raut’s press conference?
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेसाठी शिवसैनिकांनी शिवसेना भवना भोवती प्रचंड गर्दी केली होती. कोणाच्याही तोंडावर मास्क नव्हते. आणि गर्दी हटकणारे पोलीसही तेथे नव्हते. बहुचर्चित पत्रकार परिषद सुरु होण्याआधी मोठ्या संख्येने शिवसैनिक, शिवसेना नेते आणि पदाधिकारी यांनी शिवसेना भवनाकडे प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी मात्र बहुतांश शिवसैनिकांनी तोंडाला मास्क लावला नव्हता, सोशल डिस्टंसिंगचा तर पत्ताच नव्हता. सगळे नियम धाब्यावर बसवले होते. त्यामुळे सेना भवन हे “कोरोना मुक्त” झाले का?, अशी चर्चा सुरु झाली होती.
शिवसेना भवनाभोवतीच्या शक्तिप्रदर्शनात मुंबई, ठाणे, नाशिक मधून शिवसैनिक गोळा झाले होते. हजारो शिवसैनिकांनी तेथे प्रचंड घोषणाबाजी केली. एवढेच नाही तर प्रत्यक्ष संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत सगळे शिवसेनेचे आमदार खासदार अक्षरश: एकमेकांना खेटून बसले होते. तेथेही कुणाच्या तोंडावर मास्क नव्हते.
एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवजयंती साजरी करताना 500 पेक्षा जास्त लोकांचा मेळावा घेऊ नये. शिवज्योत नेताना 200 च लोक असावेत, अशा आशयाचे निर्बंध लावले आहेत आणि संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत मात्र हजारो शिवसैनिक जमले होते. त्यांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवत मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे सेना भवन “कोरोना मुक्त” झाले का?, असे खोचक सवाल आता सुरू झाले आहेत.
याआधी राज्यात जेथे आंदोलने करण्यात आली त्यामध्ये गर्दी करणा-यांवर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, तसे गुन्हे शिवसैनिकांवर दाखल होणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
Was Shiv Sena Bhavan used for Raut’s press conference?
महत्त्वाच्या बातम्या
- Sanjay Raut Press : सर्वात मोठा घोटाळा फडणवीसांच्या काळात, महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा, अमोल काळे कुठेय?
- संजय राऊतांची पत्रकार परिषद : उद्धव ठाकरेंचे 19 बंगले कुठे ते किरीट सोमय्यांनी दाखवावं, नाहीतर चपलेने मारू! सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप
- संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतला गर्भित इशारा; पवार परिवारावर छापे घातलेत, पण ठाकरे परिवारावर घालाला तर बघा!!