• Download App
    23, 24 जानेवारीला उत्तर मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा । Warning of unseasonal rains in North Central Maharashtra on 23rd and 24th January

    23, 24 जानेवारीला उत्तर मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : जानेवारी महिना संपत आला तरी अवकाळी पावसाचा जोर कमी झालेला नाही. येत्या २३ व २४ जानेवारीला कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तज्ज्ञांंच्या मते, ला निना परिस्थिती निर्माण झाल्यानेच हवामान बदलले आहे. तसेच कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असून हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. Warning of unseasonal rains in North Central Maharashtra on 23rd and 24th January



    नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही अवकाळीची नोंद झाली होती. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला होता. याचाच परिणाम कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या २३ व २४ जानेवारीला नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रत्नागिरी, अहमदनगर, जळगाव या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

    ला निना परिस्थिती म्हणजे काय?

    पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वांत मोठा महासागर आहे. तेथील वारे आणि प्रवाहांचा जगावर थेट परिणाम होताना दिसतो. त्यात दक्षिण गोलार्धात भूभाग कमी असल्याने प्रशांत महासागराच्या दक्षिण भागातील तापमान जगाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. यालाच सदर्न ऑसिलेशन असे म्हणतात. ला निनाच्या प्रभावामुळे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होते. त्याचा परिणाम फक्त या भागातच नाही तर शेजारी असलेल्या हिंदी महासागरातील सागरी प्रवाहावर आणि वाऱ्यांवर म्हणजे मान्सूनवर होतो. पर्यायाने ला-निनाच्या काळात भारतात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. ला-निनाच्या प्रभावामुळे एकूणच उत्तर गोलार्धात तापमानही कमी होते.

    Warning of unseasonal rains in North Central Maharashtra on 23rd and 24th January

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा