विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. काही तांत्रिक काम सुरू असताना धरणाचा दरवाजा अडकला आणि हा पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीपात्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Warning: Discharge of water from Radhanagari dam increased due to technical problem! Warning to the villages along the Panchganga river
पंचगंगा नदीची पातळी तीन ते चार फूट वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
आज सकाळी साडेआठ वाजता राधानगरी धरणातील सर्व्हिसिंग गेटचे काम सुरू होते. त्यावेळी दरवाजा खाली घेण्याचे काम सुरू असताना ही तांत्रिक समस्या निर्माण झाली आणि दरवाजा अडकला. त्यामुळे धरणातुन नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Warning: Discharge of water from Radhanagari dam increased due to technical problem! Warning to the villages along the Panchganga river
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेने साधले काम; मुंबई महापालिकेतले ९ प्रभाग वाढविले; विद्यापीठ विधेयकही विधानसभेत मंजूर; पण राज्यपालांची स्वाक्षरी बाकी!!
- रजपूत आणि दाभोळकर केस देखील सीबीआय कडेच आहेत. त्यांचे काय झाले? राज्य सरकार झालेल्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत आहे ; रोहित पवार
- AURANGABAD : महाराष्ट्रातील अनेक भागात गारपीट; शेतकरी हवालदिलऔरंगाबाद-अकोला-अहमदनगर-वाशिम-गोंदियाला तडाखा
- UNSC : 2022-भारत भूषवणार UNSC दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्षपद; दुसऱ्यांदा जबाबदारी