• Download App
    पायी वारीसाठी वारकरी संप्रदाय आग्रही, पुनर्विचारासाठी सरकारला पुन्हा साकडे|Warakari insists for Pai Wari; Ask the government to reconsider

    पायी वारीसाठी वारकरी संप्रदाय आग्रही, पुनर्विचारासाठी सरकारला पुन्हा साकडे

    वृत्तसंस्था

    पुणे : राज्य सरकारने नेहमीप्रमाणे पायी वारील परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदायातील दहा संस्थान यांनी केली. आता याबाबत चर्चा करण्यासाठी उद्या दहा संस्थान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत. Warakari insists for Pai Wari; Ask the government to reconsider

    कोरोनामुळे यंदाचा आषाढी वारी सोहळा एसटीतूनच पाठविण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केल. पण या निर्णयानंतर वारकरी संप्रदायात असंतोष निर्माण झाला. आता राज्य सरकारने पुनर्विचार करावा यासाठी हे संस्थान आग्रही आहेत.



    राज्य सरकारच्या निर्णयानंतर नाराज झालेल्या देहू संस्थानच्या विश्वस्तांनी बैठक घेतली. या बैठकीत नेमके राज्य सरकारला कसं साकडं घालायचं, त्यांनी पुनर्विचार करावा यासाठी कशी मागणी करायची. याचा निर्णय घेतला जाणार आहे.

    हाही संस्था त्यांच्या पातळीवर अशा बैठका पार पाडत आहेत आणि उद्या या दहा संस्था व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून, त्यांची पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

    वारकऱ्यांची ही नाराजी पाहता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा चर्चेची तयारी दर्शवली आहे. विभागीय आयुक्त सौरव राव या दहा संस्थांशी बैठक घेतील असं ही त्यांनी स्पष्ट केलंय. शासनाच्या या निर्णयाचं वारकरी संप्रदायाने स्वागत केले आहे. अशीच पायी वारीला परवानगी दिलं तर वारकरी त्यांचे कायमचे ऋणी राहतील.

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक पाऊल पुढं टाकलंय. त्यामुळं आता विभागीय आयुक्तांशी या दहा संस्थानांची चर्चा होईल. म्हणूनच अखंड वारकरी संप्रदायाला पुन्हा एकदा पायी वारीची आस लागून राहिली आहे.

    गेल्या वर्षी कोरोनाचे संकट सुरु झाल्याने आषाढी वारी संचारबंदीमध्ये झाली होती. यंदा कोरोनाचे संकट मोठ असताना पालखी सोहळ्याने यंदा पायी सोहळ्यास परवानगी देण्याचा आग्रह धरला आहे.

    सर्व कडक निर्बंध वारकरी संप्रदाय पाळण्यास तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही झाले तरी पायी वारीची परंपरा या वर्षी खंडित होऊ देऊ नका, अशी संप्रदायाची मागणी आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा बसमधून पालखी सोहळे आणावे लागणार असून यंदा फक्त 10 पालख्यांना 20 बस दिल्या जाणार आहेत.

    भाविकांची संख्या देखील दुप्पट करीत वारकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न प्रशासनानं केला आहे. याशिवाय विसाव्यापाशी होणारे प्रतिकात्मक रिंगण करून दिड किलोमीटर पायी  चालत येण्यास निर्बंध घालून परवानगी दिली आहे.

    Warakari insists for Pai Wari; Ask the government to reconsider

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ