प्रतिनिधी
मुंबई : धुळे, अहमदनगर, नांदेड – वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महापालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.Voting for the by-elections for the vacant posts in the four Municipal Corporations on December 21
मदान यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत स्वीकारले जातील. 5 डिसेंबर 2021 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 7 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे.
22 डिसेंबरला होणार मतमोजणी
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 10 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी करण्यात येणार आहे.
महापालिकानिहाय रिक्तपदे अशी
धुळे – 5 ब
अहमदनगर – 9 क
नांदेड वाघाळा – 13 अ
सांगली मिरज कुपवाड – 16 अ
Voting for the by-elections for the vacant posts in the four Municipal Corporations on December 21
- वैयक्तिक वापरासाठी मर्यादित प्रमाणात ड्रग बाळगणे गुन्हा नाही या संबंधी नवे विधेयक पास होण्याची शक्यता
- WATCH : मराठा आरक्षणप्रश्नी पुणे ते मुंबई लॉंग मार्च संभाजीराजे यांची पुण्यात घोषणा
- अभिनेत्री हेमा मालिनी ह्या वृद्ध झालेल्या आहेत, कॅटरिना कैफच्या गालांसारखे रस्ते बनवा ; नवनिर्वाचित राजस्थानचे ग्रामीण विकास मंत्री राजेंद्र गूढा
- महाराष्ट्रात कायदा – सुव्यवस्थेचे तीन तेरा आणि महिला अत्याचारांचा कळस…!!