Friday, 9 May 2025
  • Download App
    VIRAT VS DADA : विराट-गांगुली वादानंतर BCCI पुन्हा अडचणीत ; या अधिकाऱ्याचा तातडीने राजीनामा । VIRAT VS DADA: BCCI in trouble again after Virat-Ganguly dispute; Immediate resignation of this officer

    VIRAT VS DADA : विराट-गांगुली वादानंतर BCCI पुन्हा अडचणीत ; या अधिकाऱ्याचा तातडीने राजीनामा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या वाद सुरु आहेत. बीसीसीआयने अलीकडेच विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. तेव्हापासून विराट आणि बीसीसीआयकडून सातत्याने मोठमोठी वक्तव्यं येताना दिसतायत. आता याचदरम्यान बीसीसीआयकडून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. एका उच्च पदावरील अधिकाऱ्याने अचानक पदाचा राजीनामा दिला आहे. VIRAT VS DADA: BCCI in trouble again after Virat-Ganguly dispute; Immediate resignation of this officer

    या अधिकाऱ्याचा राजीनामा

    बीसीसीआयचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अभिजित साळवी यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला आहे. साळवी यांनी शनिवारी पीटीआयला सांगितले की, त्यांचा नोटीसचा कालावधी 30 नोव्हेंबर रोजी संपला होता, परंतु भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसर्‍या कसोटीपर्यंत त्यांनी काम केले जे 3 ते 7 डिसेंबर (6 डिसेंबर) दरम्यान सुरु होतं.



    कोविड-19 च्या कठीण काळात बायो-बबल वातावरण आणि खेळाडूंची वारंवार तपासणी यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची बनली होती.

    साळवी म्हणाले, “मला ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो. या संस्थेला 10 वर्षे पुढे घेऊन जाऊ इच्छित होतं. आता मला स्वतःला आणि कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. पुढील महिन्यात होणार्‍या बॉईज अंडर-16 नॅशनल चॅम्पियनशिपपूर्वी त्यांचा राजीनामा आला आहे.”

    VIRAT VS DADA : BCCI in trouble again after Virat-Ganguly dispute; Immediate resignation of this officer

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस