• Download App
    पिंपरीत विकेंड लॉकडाऊनमध्ये नियम तोडले ; मास्कशिवाय फिरणाऱ्या ४४८ जणांवर कारवाई Violation of Rules even in Pimpri Weekend Lockdown ! Action against 448 unmasked citizens

    पिंपरीत विकेंड लॉकडाऊनमध्ये नियम तोडले ; मास्कशिवाय फिरणाऱ्या ४४८ जणांवर कारवाई

    वृत्तसंस्था

    पिंपरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध तसेच विकेंड लॉकडाऊन लागू आहे. पण, अनेक नागरिक घराबाहेर पडून नियम तोडत आहेत. शनिवारी पिंपरीत विनामास्क फिरणाऱ्या ४४८ नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. तसे  नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही केले. Violation of Rules even in Pimpri Weekend Lockdown ! Action against 448 unmasked citizens



    पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. त्यासाठी संचारबंदी लागू आहे. तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरु आहे. तसेच काही नागरिक मास्कचा योग्य वापर करीत नाहीत. अशा नागिरकांवरही कारवाई होत आहे.

    पोलिसांनी येथे केली कारवाई

    एमआयडीसी भोसरी (३६), भोसरी (११), पिंपरी (०७), चिंचवड (१५), निगडी (०३), आळंदी (४१), चाकण (०६), दिघी (१४), सांगवी (१०),  हिंजवडी (३४), देहूरोड (२८), चिखली (१३), रावेत चौकी (०५), शिरगाव चौकी (१८), म्हाळुंगे चौकी (०१) या ठाण्यांतर्गत पोलिसांनी ४४८ जणांवर कारवाई केली.

    Violation of Rules even in Pimpri Weekend Lockdown ! Action against 448 unmasked citizens

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस