शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी (14 ऑगस्ट) पहाटे अपघाती निधन झाले आहे. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीचा पहाटे 5.30 वाजता भाताण बोगद्याजवळ अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना पनवेलच्या येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मेटे यांच्या एसयूव्हीचा अज्ञात वाहनाशी अपघात झाला. विनायक मेटे यांचे सुपुत्र गाडी चालवत होते. या दुर्घटनेत तेही जखमी झाले. Vinayak Mete Profile President of Shiv Sangram
विनायक मेटे यांचा परिचय
मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरणाऱ्या नेत्यांमध्ये विनायक मेटे यांचे नाव प्रामुख्याने येते. एक-दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा विधान परिषदेचे सदस्यत्व मिळविण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी असलेले विनायक मेटे व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत गेले. यादरम्यान त्यांचा मराठा महासंघाशी जवळून संबंध आला. यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. सर्वप्रथम पहिल्या युती सरकारच्या काळात त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली होती.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन; हरपला मराठा आंदोलनाचा बुलंद आवाज!!
यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी या पक्षाची स्थापना केली. परंतु, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी आपला पक्ष राष्ट्रवादीत विलीन केला. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना उपाध्यक्ष पदासह विधान परिषदेवरही दोन वेळा संधी दिली. गत लोकसभेच्या वेळी त्यांनी भाजपसोबत आघाडी केली. पक्षांतरामुळे त्यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर भाजपने त्यांना पुन्हा संधी दिल्याने त्यांनी विधान परिषदेची तिसरी टर्मही पूर्ण केली. आता चौथ्या वेळेस ते विधान परिषदेचे सदस्य होते.
मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांचे वय वाढविणे अशा अनेक विषयांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मेटे यांच्याच मराठवाडा लोकविकास मंचातर्फे मराठवाड्यातील नामांकीत व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांचा परिचय होता. सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या अपघाती निधनाने सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.
Vinayak Mete Profile President of Shiv Sangram
महत्वाच्या बातम्या
- शरतचंद्र चट्टोपाध्याय : देवदास, पथेर दाबीचे लेखक म्हणून सुप्रसिद्ध, पण फाळणीवर अचूक उपाय सांगणारे राजनेते!!
- फाळणी आणि स्वातंत्र्य : कट्टर हिंदुत्ववादी आणि कट्टर कम्युनिस्ट यांच्या आकलनात विलक्षण साम्य!!, पण मोठा भेद, तो कुठे??
- शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन; हरपला मराठा आंदोलनाचा बुलंद आवाज!!
- विनायक मेटे यांचे अपघाती निधन, दिग्गज राजकीय नेत्यांनी केला शोक व्यक्त