• Download App
    Vikram Gokhale passed away, his "Barrister" will remain in the mind forever!!

    मनावर कायमची मुद्रा उमटवलेले बॅरिस्टर!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : विक्रम गोखले गेल्याची बातमी रात्री आली, पण धक्का नाही बसला. कारण ते आजारी असल्याची, प्रकृती गंभीर असल्याची बातमी आधीच वाचली होती. त्यामुळे विक्रमजींच्या जाण्याचा धक्का बसण्यापेक्षा मन एकदम 90 च्या दशकात गेले. Vikram Gokhale passed away, his “Barrister” will remain in the mind forever!!

    त्यांचा पाहिलेला बॅरिस्टर आठवला. तारीख, महिना आणि साल लक्षात नाही, पण थिएटर मात्र लक्षात आहे, “बालगंधर्व”… रात्रीचा प्रयोग पाहिला होता. त्यांनी साकारलेला बॅरिस्टर मनावर वर्षानुवर्षे गारुड करून राहिला होता आणि आहे… त्यांच्या एंट्रीलाच पडलेली टाळी, त्यांनी रोखलेली नजर आणि नजरेतला एक पॉज आणि पुढे नाटक सुरू… हे आजही लख्ख आठवतेय… संपूर्ण नाटकभर त्यांचा बॅरिस्टर रंगमंचच नाही, तर प्रेक्षकांची मनेही व्यापून टाकत असे. त्यांचा पाहिलेला बॅरिस्टर प्रेक्षकांच्या मनातून कधी उतरेल, असे वाटलेच नाही आणि तो मनातून कधी उतरलाही नाही!!



    त्यांच्यानंतर बॅरिस्टर अनेकांनी केले. तेही मोठ्या अभिनेते होते आणि आहेत. ही वस्तुस्थिती नाकरण्याचा प्रश्नच नाही. सचिन खेडेकर यांनी बॅरिस्टर केला. त्यानंतर अतुल कुलकर्णींनी केलेला बॅरिस्टरही पाहिला, पण बॅरिस्टर म्हणजे विक्रम गोखले आणि विक्रम गोखले म्हणजे बॅरिस्टर!!, हे एकदाच बालगंधर्व मध्ये पाहिलेले बॅरिस्टरचे इक्वेशन डोक्यातून कधी गेलेच नाही… उलट सचिन खेडेकर आणि अतुल कुलकर्णीचा बॅरिस्टर पाहिल्यावर विक्रमजींचा बॅरिस्टर हे समीकरण मनात जास्तीत जास्त घट्ट रुतून बसले.

    सचिन खेडेकरांनी केलेला बॅरिस्टर आणि अतुल कुलकर्णी यांनी केलेला बॅरिस्टर हे दूरदर्शनच्या पडद्यावर पाहिले. त्यालाही बरीच वर्षे झाली. त्यानंतर ते youtube वर पाहिले. त्यांनी केलेली कामे वरच्या क्लासची नव्हती, असं अजिबात म्हणायचं नाही. त्यांनीही उत्तमच बॅरिस्टर साकारले. ते निश्चितच मोठे अभिनेते आहेत, यातही कोणती शंका नाही. किंबहुना इथे या तिन्ही अभिनेत्यांची तुलना करायची देखील नाही… पण मनावर गारुड कोण ठेवून गेलं, तर विक्रम गोखले… हे मनापासून मान्य करायचं आहे… म्हणून तर शीर्षक दिले आहे, मनावर कायमची मुद्रा उमटवलेले बॅरिस्टर…!!… बॅरिस्टर विक्रम गोखले…!!

    Vikram Gokhale passed away, his “Barrister” will remain in the mind forever!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!