Oscar committee : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अॅण्ड सायन्सेसने त्यांच्या नियामक मंडळामध्ये समावेश केला आहे. विद्याशिवाय निर्माती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनाही ऑस्कर समितीत सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले आहे. Vidya Balan and Ekta Kapoor became members of Oscar committee, got the right to vote for films selected for Academy
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचा अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अॅण्ड सायन्सेसने त्यांच्या नियामक मंडळामध्ये समावेश केला आहे. विद्याशिवाय निर्माती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनाही ऑस्कर समितीत सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे या वर्षी अकॅडमीतर्फे जगभरात एकूण 395 सेलिब्रिटी, निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपटांशी संबंधित विविध तंत्रज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या वर्षी विद्या बालन ही भारतातील एकमेव कलाकार आहे जिला अकादमीने त्यांचे सदस्य होण्यासाठी आमंत्रित केले आहे. यामुळे आता विद्या बालन यांना अकॅडमीसाठी निवडलेल्या चित्रपटांना मत देण्याचा अधिकार मिळाला आहे.
ऑस्कर अकादमीने विद्या बालनचा समावेश यावर्षी त्यांच्या प्रशासकीय मंडळाच्या यादीत केला आहे. विद्याच्या नावापुढे तिचा ‘कहानी’ आणि ‘तुम्हारी सुलू’ या दोन बहुचर्चित चित्रपटांचा उल्लेख करण्यात आला आहे. विद्या बालनच्या आधी दिवंगत वेशभूषा डिझाईनर भानु अथैया, निर्माता आणि अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संगीतकार ए. आर. रहमान, साउंड डिझायनर रसूल पोकट्टी यांना अकॅडमीचे सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले होते.
महत्त्वाचे म्हणजे 2016 मध्ये अकादमीने समितीमध्ये सामील होण्यासाठी जगभरातील 982 जणांना आमंत्रण पाठविले होते, ज्यात शाहरुख खान, दिवंगत सौमित्र चटर्जी, तब्बू, आदित्य चोप्रा, नसिरुद्दीन शाह, डॉली अहलुवालिया, बल्लू सलूजा, अनिल मेहता, मेहदाबी यांचा समावेश होता. 2020 मध्येही अनेक भारतीय चित्रपट निर्माते व तंत्रज्ञांना ऑस्कर समितीकडून समितीत सामील होण्याचे निमंत्रण मिळालं होतं.
Vidya Balan and Ekta Kapoor became members of Oscar committee, got the right to vote for films selected for Academy
महत्त्वाच्या बातम्या
- योगी सरकारने कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या राकेश टिकैत यांची सुरक्षा का वाढवली? जाणून घ्या कारण!
- काकाला अडकवण्यासाठी मुनव्वर राणांच्या मुलाने स्वत : वर झाडून घेतल्या गोळ्या, यूपी पोलिसांचा मोठा खुलासा
- माणुसकीला काळिमा : 15 हजारांसाठी तब्बल 75 दिवस कोविड रुग्णाचा मृतदेह फ्रीझरमध्ये, आता झाले अंत्यसंस्कार
- UAE Travel Ban : भारत आणि पाकिस्तानसह या देशांमध्ये प्रवासाला यूएईच्या नागरिकांना बंदी, कोरोनामुळे ट्रॅव्हल बॅन
- Tokyo Olympics : मान पटेलने रचला इतिहास, ऑलिम्पिक क्वालिफाय करणारी भारताची पहिली महिला जलतरणपटू बनली