• Download App
    ज्येष्ठ अभिनेते रमेश देव कालवश; ब्लॅक अँड व्हाईट ते डिजिटल सिनेमापर्यंत अनुभवला चित्रपटसृष्टीचा प्रवास!! Veteran actor Ramesh Dev passed away

    ज्येष्ठ अभिनेते रमेश देव कालवश; ब्लॅक अँड व्हाईट ते डिजिटल सिनेमापर्यंत अनुभवला चित्रपटसृष्टीचा प्रवास!!

    प्रतिनिधी

    मुंबई : ब्लॅक अँड व्हाईट जमाना ते डिजिटल सिनेमा असा चित्रपट सृष्टीचा संपन्न अनुभव घेणारे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे आज सायंकाळी मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली.  त्यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे.Veteran actor Ramesh Dev passed away

    रमेश देव अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1929 कोल्हापुर, महाराष्ट्रात झाला. सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिकांनी गाजलेल्या “आनंद” या चित्रपटातील आपल्या डॉक्टरच्या भूमिकेसाठी रमेश देव ओळखले जात. 1956  साली रमेश देव यांनी “आंधळा मागतो एक डोळा” या चित्रपटातून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तर “आरती” हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता. रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे.

    रमेश देव यांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द 50 वर्षांपेक्षा अधिक होती. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून ते डिजिटल मीडिया पर्यंत चित्रपट सृष्टीचा प्रवास त्यांनी पाहिला होता. त्यांनी 1962 मध्ये अभिनेत्री सीमा देव यांच्यासमवेत प्रेम विवाह केला. रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केले. या दोघांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले.

    Veteran actor Ramesh Dev passed away

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’