• Download App
    केंद्राच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन सावरकरांच्या नावे शौर्य पुरस्कार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा Veer Savarkar Setu announces Maharashtra CM Eknath Shinde on the occasion of Savarkar Jayanti

    केंद्राच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन सावरकरांच्या नावे शौर्य पुरस्कार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

    प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात येईल, त्याचबरोबर केंद्र सरकार ज्याप्रमाणे शौर्य पुरस्कार देते त्याच धर्तीवर राज्य सरकार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावे शौर्य पुरस्कार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार, २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमात केली. Veer Savarkar Setu announces Maharashtra CM Eknath Shinde on the occasion of Savarkar Jayanti

    राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘शत जन्म शोधितांना…’ या कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.

    सरकारने वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने हा दिवस गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात लहान मुलांना स्वातंत्र्यवीरांचे प्रखर राष्ट्रभक्ती, त्यांचा त्याग त्यांना शिकवला जावा यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येईल. वीर सावरकर यांच्या मृत्यूला ५७ वर्षे झाली तरी अनेकांना वीर सावरकर कळले नाहीत. काही लोक त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करत आहेत. वीर सावरकर यांचा अतोनात छळ करण्यात आला, तरी त्यांनी तडजोड केली नाही.

    सावरकर यांना दोनदा जन्मठेप दिली होती, ब्रिटिशांना त्यांची दहशत होती. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, सावरकर यांना जाऊन ५७ वर्षे उलटली तरी त्यांची दहशत कायम आहे. जर वीर सावरकर यांचे विचार लोकप्रिय झाले तर आपला बाजार उठेल, अशी भीती टीकाकारांना वाटत आहे, जबरदस्त टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

    Veer Savarkar Setu announces Maharashtra CM Eknath Shinde on the occasion of Savarkar Jayanti

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस