विशेष प्रतिनिधी
पिंपरी : भोसरी येथील वेदिका सौरव शिंदे हिला झालेल्या दुर्धर आजारातून बरे करण्यासाठी आई वडिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. लोकवर्गणीतून सोळा कोटी रुपये देऊन इंजेक्शन दिले. त्यानंतर बरी होऊन ती घरी आली.Vedika, who was injected after collecting Rs 16 crore from the crowd funding, died
मात्र रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला अचानक श्वास घेण्यास त्रास झाला. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.काही दिवसांपूर्वी भोसरीतील वेदीकाचे वडील सौरव शिंदे, आई व आजोबांनी उपचारासाठी १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन परदेशातून मागवण्यासाठी मदतीचे आवाहन काही महिन्यांपूर्वी केले होते.
त्यांच्या आवाहनाला साद देत जनतेने भरभरून प्रतिसाद दिला व सर्वच थरातून तिला मदतीचा ओघ सुरू झाला. वेदीकासाठी शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनीही तिची कस्टम ड्युटी माफ करण्यासाठी व मदतीसाठी लोकसभेत आवाज उठवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले होते.
पंतप्रधानांनीही कस्मट ड्युटी माफ करून मानवतेतचा परिचर दिला होता. त्यानंतर वेदिकाच्या उपचारासाठी मदतीचा ओघ सुरू झाला. १६ कोटी लोकवर्गणीतून जमा झाली. इंजेक्शन भारतात आले. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर इंजेक्शन देऊन पुढील उपचार घेऊन वेदिका पूर्ण बरी होऊन घरी आली होती.
सगळे व्यवस्थित सुरू आहे असे वाटत असतानाच आज काळाने वेदीकवर झडप घातली.मात्र रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला अचानक श्वास घेण्यास त्रास झाला. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिने अखेरचा निरोप घेतला
Vedika, who was injected after collecting Rs 16 crore from the crowd funding, died
महत्त्वाच्या बातम्या
- जबरदस्त : जम्मू -काश्मिरात देशद्रोह आणि दगडफेक करणाऱ्यांना ना पासपोर्ट मिळणार, ना सरकारी नोकरी; आदेश जारी
- Inspiring : शेतमजुराची मुलगी बनली सीबीएसई 12 वीची टॉपर, अडचणींवर मात करत मिळवले 100 % गुण
- चर्चेची 12वी फेरी सकारात्मक : लडाखमधील 2 वादग्रस्त स्थळांवरून माघार घेण्यास चीन तयार, पीएलए हॉट स्प्रिंग आणि गोगरा पॉइंटमधून माघार घेणार