• Download App
    कोल्हापुरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा , अमेरिकेत भारतीय वंशाच्या उर्मिला अर्जुनवाडकर नगरसेवक म्हणून पदभार स्विकारणार । Urmila Arjunwadkar of Indian descent to take over as corporator in US

    कोल्हापुरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा , अमेरिकेत भारतीय वंशाच्या उर्मिला अर्जुनवाडकर नगरसेवक म्हणून पदभार स्विकारणार

    उर्मिला अर्जुनवाडकर या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत.येथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. Urmila Arjunwadkar of Indian descent to take over as corporator in US


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : अमेरिकेत महाराष्ट्रातील कोल्हापुरकरांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवणारी घटना समोर आली आहे.होपवेल टाउनशिपच्या तीनशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांच एक भारतीय वंशांची महिला नगरसेवक म्हणून पदभार स्विकारणार आहेत. याआधी देखील अमेरिकेच्या राजकारणात अनेक भारतीय वंशाचे लोकं सक्रिय झाले आहेत.भारतीय वंशाच्या कमला हॅरिश सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत. तसेच अन्य काही भारतीय वंशाच्या नागरिकांची महत्त्वांच्या पदावर आहेत.

    भारतीय वंशाच्या उर्मिला अर्जुनवाडकर यांनी अमेरिकेतील न्यूजर्सी भागातील ‘होपवेल टाउनशिप’ येथे पार पडलेल्या निवडणुकीत मोठे यश संपादन केलं आहे.त्यांनी पार पडलेल्या निवडणुकीत स्थानिक रहिवासी एडवर्ड एम जॅकोवस्की यांचा एक हजार मताधिक्यानी पराभव केला आहे. होपवेल टाउनशिपच्या नागरिकांनी विश्वास ठेवून निवडून दिल्याने उर्मिला यांनी मतदारांचं मनापासून आभार मानले आहेत.निवडणुकीत त्यांचा विजय होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.



    कोण आहेत उर्मिला अर्जुनवाडकर

    उर्मिला अर्जुनवाडकर या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत.येथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्याचं शिक्षण जयसिंगपूर आणि सांगलीत पूर्ण झालं आहे. सध्या त्या अमेरिकेतील होपवेल टाउनशीप येथे वास्तव्याला आहे. गेल्या वीस वर्षांपासून त्या येथेच वास्तव्याला आहे.सलग वीस वर्षे होपवेल टाउनशीपमध्ये वास्तव्य केल्यानंतर, अलीकडेच त्यांनी नगरसेवकासाठी उमेदवारी जाहीर केली होती. आणि या निवडणुकीत त्या विजयी झाल्या.

    Urmila Arjunwadkar of Indian descent to take over as corporator in US

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!