विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे अर्थात यूपीएचे अस्तित्व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाकारले. या मुद्द्यावरून देशातील विरोधी पक्षांमध्ये राजकीय घमासान सुरू झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनी देखील भर घातली आहे. UPA’s political existence; nawab malik – balasheb thorat targets each other
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक कल्याणमंत्री नवाब मलिक यांनी काँग्रेसला राजकीय वास्तव स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेसची राजकीय शक्ती आता मर्यादित झाली आहे, हे वास्तव त्या पक्षाच्या नेत्यांनी स्वीकारले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.
त्यावर महाविकास आघाडी तल्या ठाकरे पवार सरकार मधले महसूलमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नवाब मलिक यांना घेरले आहे. काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पातळीवरचा मोठा पक्ष आहे. त्या पक्षाच्या नेत्यांना सल्ला देण्याएवढी नवाब मलिक यांची पात्रता नाही, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. त्याच वेळी काँग्रेस पक्षाला वगळून देशात कोणतीही विरोधी पक्षांची आघाडी उभीच राहू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची नावे न घेता त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. देशातल्या गावागावांमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता आजही काम करतो आहे. काँग्रेस एका प्रदेशात पुरता मर्यादित पक्ष नाही. कार्यकर्त्यांचे मोहोळ ह्या पक्षाकडे आहे याची आठवण त्यांनी बाळासाहेब थोरात यांनी आवर्जून करून दिली.
कालच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपशी मुकाबला करायचा असेल तर तो अहंकाराने नव्हे तर एकजुटीने करावा लागेल, असा टोला ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांना लगावला होता. त्याचीच पुनरावृत्ती आज बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
UPA’s political existence; nawab malik – balasheb thorat targets each other
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! महाराष्ट्रातील ५० हजार गावात आरोग्य यंत्रणाच नाही !औरंगाबाद खंडपीठात बबनराव लोणीकरांनी केली याचिका दाखल
- ममता बॅनर्जी – भूपेंद्र पटेल; एकीकडे राजकीय गाजावाजा; दुसरीकडे आर्थिक गुंतवणुकीला हवा!!
- राज्यावर घोंगवतेय ‘जोवाड’ चक्रिवादळ; अवकाळीमुळं पिकांचंही मोठं नुकसान
- कोरोना संसर्गाची माहिती लपविल्याबद्दल ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड
- म्यानमारमधील लोकांची अवस्था बिकट, संयुक्त राष्ट्रांकडून मदतीचे आवाहन
- अफवा, दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी ‘ट्विटर’ने उचलले नवे पाउल, वर लवकरच दिसणार नवी रचना असलेले लेबल
- २०१४ नंतर भारत बनला अमेरिकेचा गुलाम – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर यांचा हल्लाबोल