• Download App
    ...तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांचा पालक आहे - आमदार निलेश लंके। Until then, I am the parent of these students - MLA Nilesh Lanka

    …तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांचा पालक आहे – आमदार निलेश लंके

    पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार नीलेश लंके यांनी रात्री उशिरा या कोरोना बाधितांची भेट घेतली. Until then, I am the parent of these students – MLA Nilesh Lanka


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील कोरोनाबधितांची संख्या रुग्णसंख्या ८२ झाली आहे. या कोरोना बाधितांवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार नीलेश लंके यांनी रात्री उशिरा या कोरोना बाधितांची भेट घेतली.



    तसेच जोपर्यंत विद्यार्थी कोरोनामुक्त होणार नाहीत. तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांचा पालक आहे असा आधार आमदार निलेश लंके यांनी रूग्णालयात जाऊन सर्व बाधित विद्यार्थ्यांना दिला आहे.या सर्व बाधित रुग्णांचा सर्व लागणारा खर्च निलेश लंके प्रतिष्ठान मार्फत मोफत केला जाईल.

    प्रशासनाला व आरोग्य विभागाला सतर्क राहण्याची सूचना आमदार लंके यांनी दिल्यात.आमदार लंके यांनी मुलांचे मनोबल वाढवत म्हटले आहे की, पालक व विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, काळजी करू नये. उपचारासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाईल, सर्वोत्तम उपचार केले जातील.

    Until then, I am the parent of these students – MLA Nilesh Lanka

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना