प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी अंदाधुंद निर्णयांची प्रक्रिया सुरू असून, राज्यपालांनी राज्याच्या परिस्थितीत हस्तक्षेप करावा असे भाजपने राज्यपालांना पत्र दिले आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांकडून सह्या करण्यासाठी तगादे वाढल्याने बहुतांश सचिव, उपसचिव, अवर सचिव आणि अन्य अधिकारी रजेवर गेले आहेत. Unstable government: NCP-Congress ministers struggle even after leaving power
मंत्रालयातील अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अचानक सुट्टीवर गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. परंतू सरकार पडण्याआधी मंत्रालयातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांकडून असंख्य निर्णय मंजूर करून घेण्यासाठी आणि त्या मंजुरीच्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव वाढला आहे.
सत्ता जाता जाता शेवटच्या टप्प्यात मंजूरीसाठी आलेली कामे उरकण्याकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांचा कल वाढला आहे. ते धडाधड निधी मंजूर करत आहेत आणि तो रिलीज करण्यासाठी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आणत आहेत. त्यात नवीन सरकार आल्यास आपण अडचणीत सापडू नये म्हणून अधिकारी घाईघाईत सही करण्यास टाळाटाळ करीत आहे.
मंत्रालयातील अनेक उपसचिव, सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव दोन दिवसांपासून सुट्टीवर आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी रजेवर गेले आहेत.
Unstable government: NCP-Congress ministers struggle even after leaving power
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेत फूट : बंडखोरांच्या पाठिशी भाजप; अजित पवार – शरद पवारांची परस्परविरोधी वक्तव्ये!!; मुनगंटीवारांचा दोन्ही नेत्यांना टोला
- अफगाणिस्तानात भूकंपामुळे मोठा विध्वंस, 3200 जण ठार, 1000 हून अधिक जखमी, भारत-पाकसह या देशांनी मदत केली जाहीर
- शिवसेनेत फूट : सरकार वाचवण्यासाठी सर्वाधिक तगमग पवार आणि राष्ट्रवादीची; शिवसेना – काँग्रेसचे राष्ट्रवादीवर शरसंधान!!
- आयती मिळालेली सत्ता निसटण्याची काँग्रेस – राष्ट्रवादीला धास्ती; संजय राऊतांच्या वक्तव्यावर मंत्र्यांची नाराजी!!