• Download App
    सततचा पाऊस आता ‘नैसर्गिक आपत्ती’; शेतकऱ्यांना मदतीसाठी शिंदे - फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयUnseasonal rain a natural disaster, shinde fadnavis government to help farmers

    सततचा पाऊस आता ‘नैसर्गिक आपत्ती’; शेतकऱ्यांना मदतीसाठी शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

    प्रतिनिधी

    मुंबई : अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल झाला असताना, राज्य शासनाने त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. Unseasonal rain a natural disaster, shinde fadnavis government to help farmers

    मंत्रालयात बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सुधारित रेती धोरणास मान्यता देण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता देण्यात आली. या माध्यमातून ४३.८० किमीचा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे.



    देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिवाय सेलर इन्स्टीट्यूट “सागर” भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरणास मान्यता देण्यात आली.

     कॅबिनेटमधील महत्त्वाचे निर्णय

    •  अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील १४ पदे निर्माण करणार
    •  महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी देणार
    •  अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता
    •  नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता परिस स्पर्श योजना आणणार

    Unseasonal rain a natural disaster, shinde fadnavis government to help farmers

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!