• Download App
    WATCH : 'प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; 2024 मध्ये येणार मोदी! केंद्रीय मंत्री आठवले । Union Minister Ramdas Athawale Criticizes Sharad Pawar And Prashant Kishor Through His Poem

    WATCH : ‘प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; 2024 मध्ये येणार मोदी! – केंद्रीय मंत्री आठवले

    Union Minister Ramdas Athawale : प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; 2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी ! नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी; मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी? असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत म्हटले आहे. प्रशांत किशोर हे 2014 च्या निवडणुकित नरेंद्र मोदींसोबत होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत प्रशांत किशोर मोदींसोबत नव्हते तरीही 2019 च्या निवडणुकीत 303 जागा मिळवीत मोठा विजय मोदींच्या नेतृत्वात भाजपला मिळाला. ज्या राज्यात प्रशांत किशोर यांनी प्रचार केला नाही त्या राज्यांत ही भाजप ला विजय मिळालेला आहे. त्यामुळे माझे म्हणणे आहे प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी कारण 2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी असे ना. रामदास आठवले आज मुंबईत संविधान निवासस्थानी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हटले. विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही. त्यांच्यात एकमत नाही. एनडीए सोबत नसणारे विरोधी पक्षातील अनेक पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत आहेत. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी येत्या 2024 च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप एनडीए प्रचंड बहुमत मिळवून विजयी होतील आणि पुन्हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. Union Minister Ramdas Athawale Criticizes Sharad Pawar And Prashant Kishor Through His Poem

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य